(म्हणे) ‘अयोध्येत राममंदिर आणि बाबरी मशीद यांपूर्वी बौद्ध मंदिर होते !’

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इतक्या वर्षांनंतर लावलेला जावईशोध !
  • केंद्रीय मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची विधाने त्यांना हास्यास्पद ठरवण्यासह मंत्रीपदाचा अवमान करणारीही आहेत !

जयपूर (राजस्थान) – अयोध्येमध्ये राममंदिर आणि बाबरी मशीद यांपूर्वी बौद्ध मंदिर होते. नंतर मुसलमान आणि हिंदू यांनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राममंदिर आणि मशीद बांधली. आज जरी राममंदिराच्या जागेवर खोदकाम केले, तरी तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. (राममंदिराच्या ठिकाणी पुरातत्व खात्याने दोन वेळा खोदकाम केले आहे आणि तेथे राममंदिर होते, याचेच अवशेष सापडले आहेत. ही माहिती न्यायालयातही सांगण्यात आलेली आहे आणि त्या आधारे ‘तेथे राममंदिर होते’, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. तरीही रामदास आठवले हास्यास्पद विधाने करून आणि त्याची पडताळणी करण्याची मागणी करून स्वतःचे अज्ञान दाखवत आहेत. असे राजकारणी कसा कारभार करत असतील याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक) तसेच ‘अयोध्येत मंदिर आणि मशीद दोन्हीही व्हायला हवे’, असेही ते म्हणाले. येथील ‘पिंक सिटी प्रेस क्लब’मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. (असे वक्तव्य करणे; म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान होय ! – संपादक)

आठवले पुढे म्हणाले की,

१. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे; पण त्या ६० एकर जागेपैकी ४० एकर जागा राममंदिरासाठी मिळावी आणि २० एकर जागा बाबरी मशिदीसाठी मिळावी. (प्रकरण न्यायालयात आहे, तर आठवले त्यावर विधान का करत आहेत ? – संपादक)

२. कुणी कितीही आंदोलने करावीत; पण अनुसूचित जाती आणि जमाती, तसेच अन्य मागासवर्गीय यांना मिळालेले आरक्षण बंद करता येणार नाही. (आरक्षण म्हणजे गुणवत्ता  नसणार्‍यांना संधी देऊन गुणवत्ता असणार्‍यांवर अन्याय करणे होय ! – संपादक) सवर्णांमध्येही सगळेच श्रीमंत नसतील. त्यामुळे जातीय आरक्षणाची मागणी होऊ लागली आहे.

(म्हणे) ‘पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने फरक पडत नाही; कारण मला ते फुकट मिळते !’

पेट्रोल आणि डिझेल यांचे भाव अल्प व्हायला हवे. माझ्या पक्षाचीही हीच भूमिका आहे; पण मला पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीने काहीही फरक पडत नाही; कारण मी एक मंत्री आहे. त्यामुळे माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते; पण माझे मंत्रीपद गेल्यावर ही झळ मलाही बसेल, असे आठवले म्हणाले. (सरकारमधील मंत्र्यांच्या सर्वच गोष्टींमध्ये अशी मानसिकता असल्याने जनतेचे कितीही हाल झाले, तरी मंत्र्यांना त्याची झळ बसत नसल्याने ते सत्तेच्या धुंदीत रहातात ! – संपादक) या विधानवरून त्यांच्यावर टीका झाल्यावर त्यांनी क्षमा मागितली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now