वर्ष २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राममंदिराचे बांधकाम चालू होणार ! – भाजपचे खासदार डॉ. रामविलास वेदांती

दुधाने तोंड पोळलेले ताकही फुंकून पित असल्याने राममंदिराविषयी कुणी कितीही अशा घोषणा केल्या, तरी प्रत्यक्ष उभारणी चालू झाल्याविना भाजपवाल्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवता येऊ शकत नाही !

प्रयाग – अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न भाजपने सोडवलेला आहे. लवकरच या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल आणि त्यानंतर राममंदिराचे काम चालू होईल. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असा दावा भाजपचे खासदार डॉ. रामविलास वेदांती यांनी प्रयाग येथील एका कार्यक्रमात केला. डॉ. वेदांती यांनी राममंदिराच्या बांधकामाचा निश्‍चित दिनांक सांगितला नाही. (‘मंदिर वहीं बनायेंगे लेकीन तारीख नहीं बतायेंगे’ अशा वृत्तीचे भाजप नेते ! – संपादक)

डॉ. रामविलास वेदांती पुढे म्हणाले की, हे मंदिर जगातील सर्वांत मोठे राममंदिर असणार आहे. लक्ष्मणपुरी येथे मोठी मशीददेखील बांधली जाणार आहे. (धर्मांधांना चुचकारण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now