महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केलेल्या ‘आध्यात्मिक नेतृत्व’ या विषयावरील शोधप्रबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त !

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे शोधप्रबंधाचे लेखक !

  • खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते ! – शंभू गवारे

  • आयोजकांकडून श्री. शंभू गवारे यांना निवड समितीचे सदस्य होण्याची विनंती

श्री. शंभू गवारे

पुरी (ओडिशा) – ‘यथा राजा तथा प्रजा’, अशी एक उक्ती आहे. अकार्यक्षम नेत्यांमुळे समाजाची स्थिती खराब होते, हे आज सर्वच जण अनुभवत आहेत. त्याच न्यायानेे चांगल्या नेत्यांमुळे समाजाचे कल्याण साधले जाऊन तेथे शांती नांदते. खरे नेतृत्व केवळ उच्च आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्यानेच साध्य होते. आधुनिक वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने याचा अभ्यास करण्याच्या हेतूने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. यात ‘यु.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या व्यक्तीमधील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा अन् त्याची प्रभावळ मोजणार्‍या उपकरणाद्वारे जगातील ४ प्रसिद्ध नेत्यांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनावर आधारित ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते’, हा शोधप्रबंध पुरी, ओडिशा येथे १६ सप्टेंबर या दिवशी ‘अर्थशास्त्र, व्यवसाय आणि समाजशास्त्र’ या विषयावरील ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. ICISDSMT IIRAJ Researchers Forum (WWPE Trust) आणि इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अ‍ॅण्ड पब्लिकेशन (IResearchPub) हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधप्रबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून सहलेखक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आहेत. सदर शोधप्रबंध महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शंभू गवारे यांनी सादर केला. या वेळी परिषदेच्या आयोजकांनी श्री. गवारे यांचे शोधप्रबंध चांगला सादर केल्याविषयी अभिनंदन केले, तसेच त्यांना परिषदेच्या निवड समितीचे सदस्य होण्याचीही विनंती केली. याचसमवेत श्री. गवारे यांनी मांडलेल्या शोधप्रबंधाला आयोजकांकडून ‘सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री. शंभू गवारे यांनी मांडलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. शोधप्रबंधाच्या चाचणीसाठी घेतलेल्या ४ नेत्यांपैकी एक हुकूमशहा, दुसरे प्रसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), तिसरे एका देशाचे राजकीय प्रमुख आणि चौथे उच्च आध्यात्मिक स्तर असलेले संत आहेत.

२. या चाचणीतील निरीक्षणांचे विश्‍लेषण करतांना लक्षात आले की, हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. हुकूमशहाकडून नकारात्मक स्पंदने येणे समजू शकतो; परंतु एका प्रख्यात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यामधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे आश्‍चर्यकारक वाटते. पुष्कळ सकारात्मकता प्रक्षेपित करणारे संत वगळता अन्य कोणातही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. प्रभावळीच्या निरीक्षणांतही संतांचीच प्रभावळ सर्वाधिक असल्याचे आढळले.

३. उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष निघाले आहेत, तसेच सूक्ष्म स्पंदनशास्त्राचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांनी या चारही नेत्यांचा अभ्यास केला असता हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे नकारात्मक स्पंदनांच्या अधीन असलेले आढळले. राजकीय नेता नकारात्मक स्पंदनांच्या अधीन नसला, तरी त्या स्पंदनांचा प्रभाव त्या नेत्यावर होता. संतांमधील सकारात्मकता मात्र एवढी होती की, ती त्यांच्यावर नकारात्मक स्पंदनांचा काहीच परिणाम होत नव्हता.

४. नित्य उपासना, स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांच्यासाठी सतत प्रयत्नरत असणे, विचार आणि कृती अधिकाधिक आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक बनवणारी संस्कृती आणि धर्माधिष्ठित निर्णयप्रक्रिया, ही सूत्रे आध्यात्मिक नेतृत्व विकसित करू शकतात. या सूत्रावरून हे स्पष्ट होते की, वरील सूत्रांनूसार कृती केल्यास व्यक्ती आदर्श नागरिक बनू शकते. यांतील काही आदर्श नागरिक पुढे आदर्श नेते बनू शकतात. असे आदर्श नेते समाजामध्ये नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now