दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणार्‍या लिखाणाच्या संकलनाची सेवा करू इच्छिणार्‍या साधकांनी आपली माहिती पाठवावी !

‘साधकांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधकांना मिळत असलेले विविध विषयांचे ज्ञान दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होते. या विषयांवरील ३ सहस्रांहून अधिक धारिकांचे संकलन करणे शेष आहे. या सेवेसाठी साधकांची संख्या अल्प असल्याने ती सेवा प्रलंबित आहे.

जे साधक ही सेवा घरी राहून करण्यास इच्छुक आहेत, तसेच जे साधक प्रसारात सेवा करतात आणि इतर वेळी संकलन सेवा करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील पत्त्यावर आपली माहिती पाठवावी. ही सेवा करण्यासाठी मराठी भाषेचे साधारण ज्ञान असणे आवश्यक आहे. या साधकांना मराठी भाषेतील व्याकरणाचे नियम आणि सनातनची संकलनाची संगणकीय पद्धत शिकवण्यात येईल. सेवा शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात न्यूतनम १५ ते २० दिवस येऊन रहाणे अपेक्षित आहे. त्यानंतर साधकांना घरी राहूनही ही सेवा करता येईल.

मजकुराचे संकलन करण्यात पुढील सूत्रांचा समावेश असतो.

१. मजकुरातील अनावश्यक भाग काढणे

२. व्याकरण सुधारणे

३. परिच्छेद करून मथळे देणे

४. आवश्यकता असल्यास शिरोभाग लिहिणे

संकलनाची सेवा ‘श्रीलिपी’ या प्रणालीमध्ये केली जाते. ज्यांना ‘मॉड्युलर’ लिपीत मराठी टंकलेखन येत नसेल, ते काही दिवस घरी टंकलेखनाचा सराव करू शकतात. सराव झाल्यावर ते रामनाथी आश्रमात येऊन संकलनाची सेवा शिकू शकतात.

संकलनाची सेवा करू इच्छिणार्‍या साधकांनी त्यांची माहिती ‘[email protected]’ या संगणकीय पत्त्यावर पुढील साधिकेच्या नावे पाठवावी किंवा त्यांना संपर्क करावा.

संपर्क : सौ. भाग्यश्री सावंत – भ्र. क्र. ७०५८८८५६१०

पत्ता : २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३४०१.

साधकांनी पाठवावयाची माहिती

१. पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वय, शिक्षण

२. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण कोणत्या माध्यमातून (मराठी / इंग्रजी / हिंदी इत्यादी) झाले आहे ?

३. घरी संगणक आहे का ? ‘ई-मेल’ची व्यवस्था आहे का ? असल्यास ई-मेलचा पत्ता.

४. मराठी टंकलेखन येते का ? असल्यास कोणत्या प्रणालीमध्ये ? (उदा. ए.पी.एस्., श्रीलिपी, आकृती इत्यादी)

५. संकलनाच्या सेवेचा काही अनुभव आहे का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now