सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मुसलमान विद्यार्थी यांच्या पुढाकाराने धर्मविरोेधी गणेशोत्सव साजरा !

पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याच्या नावाखाली वृक्षालाच दिले श्री गणेशाचे रूप

हिंदूंनो, अन्य धर्मियांना उत्सवात सहभागी करून घेतल्याचा दुष्परिणाम जाणा ! ‘निसर्गदेवो भवः ।’ हा वेदातील उद्घोष धर्मांधांचा पंथ उदयाला येण्यापूर्वी सहस्रो वर्षांपूर्वी आहे. हिंदूंनी निसर्गाला देव मानलेलेच आहे; त्यांना ते कोणी अन्य धर्मियांनी शिकवण्याची आवश्यकता नाही ! हिंदूंनी धर्मांधांच्या उत्सवात किंवा धार्मिक गोष्टींच्या संदर्भात ढवळाढवळ केलेली त्यांनी कधी खपवून घेतली असती का ? जन्महिंदूंच्या तथाकथित सर्वधर्मसमभावामुळेच ते धर्मांधांना त्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बोलावतात आणि धर्मांध त्यांना धर्माचरणापासून दूर नेतात, हे त्यांना कळतही नाही !  हिंदूंची ‘दगडात देव आहे’, ही श्रद्धा आहे. त्यावर घाला घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे हिंदूंनी धर्मांधांना निक्षून सांगायला हवे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचेच हे दुष्परिणाम आहेत !

सोलापूर – येथे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, सोलापूर विशेष प्रशिक्षण केंद्र क्र. १३, नई जिंदगी येथे मुसलमान समाजातील विद्यार्थ्यांकडून ‘इको फ्रेंडली’ गणपती आणि पर्यावरणाचे संवर्धन समाजाला पटवून देण्याच्या नावाखाली एका वृक्षालाच श्री गणेशाचे रूप देण्यात आले होते. या वेळी ‘मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी निसर्गात आहे’, असा हिंदु धर्मविरोधी संदेश लिहिण्यात आला होता. हा कार्यक्रम प्रकल्प संचालिका अपर्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पोतदार, शिक्षक वहिदा मुजावर, शितल कांबळे, सेविका उषा गायकवाड यांनी आयोजनात सहभाग घेतला. (पर्यावरणरक्षणाचा उपदेश हिंदूंच्या सणांना करणारेे समाजसेवक या मुसलमान विद्यार्थ्यांना ‘इको फ्रेंडली’ बकरी ईद साजरी करा, असा संदेश का देत नाहीत ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now