दादर परिसरात गटाराच्या बाजूला घाणीत ठेवून श्री गणेशाच्या मूर्तीची विक्री

श्री गणेशाच्या मूर्ती घाणीमध्ये विक्रीसाठी ठेवण्याइतपत हिंदूंच्या धार्मिक भावना बोथट झाल्या आहेत का ?

जिथे देवतेची मूर्ती असते, तिथे तिचे तत्त्व कार्यरत होते. ज्या देवतेच्या मूर्तींचे आपण घरी आणून भावपूर्ण पूजन करतो, त्यांना अशा प्रकारे रस्त्यावरील अस्वच्छ जागेत ठेवणे अयोग्य आहे. विक्रेत्यांनीही या मूर्ती योग्य जागी ठेवल्यास त्यांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. मूर्ती अस्वच्छ जागी ठेवल्याने देवतेचा अवमान होऊन धार्मिक भावना दुखावल्या जातात.

कबूतरखाना परिसरात गटाराच्या बाजूला विक्रीसाठी ठेवलेल्या श्री गणेशमूर्ती

मुंबई, १६ सप्टेंबर (वार्ता.) – दादर (पश्‍चिम) येथील कबूतरखाना परिसरात  पक्षांची विष्ठा असलेल्या जागेत, तसेच याच ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या कडेला गटारांवर घाणीत वस्तू विक्रीला ठेवल्याप्रमाणे श्री गणेशाच्या मूर्तींची विक्री करण्यात येत होती. या मूर्ती गटाराचे घाण पाणी असलेल्या आणि खरकटे टाकलेल्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. ज्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत, हे आपले आराध्य दैवत आहे, याचे भान न विक्री करणार्‍यांना आहे, ना विकत घेणार्‍या भाविकांना आहे. याविषयी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने एका विक्रेत्याला याविषयी जाणीव करून दिली असता रस्त्यावर असलेल्या एका पादचार्‍याने मूर्तींच्या विक्रीसाठी अन्य जागा नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

चिकणमातीच्या मूर्तीं दुर्मिळ

या परिसरातील सर्व मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत्या. विक्रेत्यांना शाडूच्या मातीची मूर्ती विचारली असता शाडूच्या मातीच्या मूर्ती नाजूक असल्यामुळे त्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आर्थिक हानी होत असल्यामुळे विक्रीसाठी ठेवत नाही, असे सांगितले. यांमध्ये अनेक मूर्ती या विविध देवतांच्या रूपांमध्ये साकारण्यात आल्या होत्या.


Multi Language |Offline reading | PDF