जर्मनीत रोमन कॅथलिक चर्चच्या १ सहस्र ६७० पाद्य्रांनी ७० वर्षांत ३ सहस्र ६७७ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केले

  • अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि भारत येथे पाद्य्रांकडून झालेल्या या घटना पहाता चर्चमध्ये धार्मिकता आहे का ?, याचाच आता शोध घेण्याची वेळ आली आहे !
  • अशी वृत्ते भारतातील प्रसारमाध्यमे प्रसिद्ध करत नाहीत; कारण बहुतेकांचे मालक ख्रिस्ती आहेत !
  • ख्रिस्त्यांचे खरे वासनांध स्वरूप !

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीतील रोमन कॅथलिक चर्चमधील १ सहस्र ६७० पाद्य्रांनी वर्ष १९४६ ते २०१४ या काळात ३ सहस्र ६७७ अल्पवयीन मुलांचे लेंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहे, असे वृत्त जर्मनीतील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक ‘डेर स्पिगल’ने दिले आहे. हे सर्वेक्षण जर्मनीतीलच बिशप परिषदेने नेमलेल्या ३ विश्‍वविद्यालयाच्या चौकशी समितीने केले असून तिचा अहवाल नुकताच परिषदेला सादर करण्यात आला आहे.

१. परिषदेच्या प्रवक्त्त्याने एका वृत्तसंस्थेस मुलाखत देतांना सांगितले की, या अहवालाचा अभ्यास करण्यात येत असून लवकरच त्याविषयी निवेदन करण्यात येईल.

२. वरील चौकशी समितीने ३८ सहस्र जणांचे जबाब घेतले असून देशातील २७ चर्चमधील अनेक संदर्भ धारिकांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार लैंगिक शोषणाचे अर्ध्याहून अधिक बळी गुन्हा घडला तेव्हा जवळपास १३ वर्षे वयाची मुले होती. अनेक प्रकरणात पुरावे एकतर नष्ट करण्यात आले, तर काही पुरावे पालटण्यात आले.

३. ‘डेर स्पिगल’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अनेक पाद्य्राचे केवळ इतर चर्चमध्ये स्थानांतर करण्यात आले असून तेथील समाजाला या पाद्य्रांचा इतिहास सांगितलेला नव्हता.

४. लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अनेक पाद्य्रांंपैकी केवळ एकावरच चर्चच्या नियमांप्रमाणे कारवाई झाली असून इतरांना नाममात्र शिक्षा करण्यात आली आहे. आरोप असलेल्या पाद्य्रांंपैकी ४ टक्के पाद्री अद्यापही कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF