घुसखोर चीनवर विश्‍वास ठेवू नये ! – संसदीय समिती

असे सांगायला संसदीय समिती कशाला हवी ? भारतातील शाळेतील विद्यार्थीही हे सांगू शकतो; मात्र भारतीय शासनकर्ते यानुसार वागतात का ?, हा प्रश्‍न आहे !

नवी देहली – चिनी सैनिकांकडून सतत भारतीय सीमेत होणारी घुसखोरी आणि आडमुठ्या धोरणामुळे भारताने सतर्क रहावे, अशी सूचना संसदीय समितीने केली आहे. ‘चीनची पार्श्‍वभूमी पहाता त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही. चीनने केवळ विचार मांडू नये, तर त्यांचे पालन करावे’, असे संसदीय समितीने तिच्या अहवालात म्हटले आहे.

१. ‘स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह मॅकॅनिझम’ला मानण्यास चीन सिद्ध नसल्याने परराष्ट्र विषयासंबंधीच्या संसदीय समितीने या अहवालात वरील सूचना केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्ष २००३ मध्ये चीनचा दौरा केल्यानंतर ‘स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह मॅकॅनिझम’ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये २० वेळा बैठक झाली. चीनसोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी ‘स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह मॅकॅनिझम’ महत्त्वाचे मानले जाते.

२. या अंतर्गत दोन्ही देशांत वसलेल्या जनतेला विस्थापित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण तरीही चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आहे. तसेच डिसेंबर २०१२ मध्ये १२ आणि १३ क्रमांकाच्या नियमांचे चीनने डोकलाममध्ये घुसखोरी करून उल्लंघन केले. चीनच्या कुरघोड्यांमुळेच तेथील सीमेवर भारताच्या पायाभूत सुविधा कमकुवत राहिल्या आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now