गणेश कपाळे यांना कह्यात घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने वडील मधुकर कपाळे यांचा मृत्यू !

नालासोपारा कथित स्फोटके सापडल्याचे प्रकरण !

जालना – नालासोपारा कथित स्फोटकप्रकरणी गणेश कपाळे यांना कह्यात घेण्यात आल्यामुळे त्यांचे वडील मधुकर कपाळे (वय ६८ वर्षे) यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे त्यांचा १४ सप्टेंबरला मृत्यू झाला, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते.

नालासोपारा कथित स्फोटकप्रकरणी येथून गणेश कपाळे यांना कह्यात घेण्यात आले होते. या आधी एटीएस्ने येथून श्रीकांत पांगारकर यांना अटक केली होती. त्यानंतर एटीएस्ने कपाळे यांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते. एटीएस्ने गणेश यांना संभाजीनगर येथे नेले. हा धक्का त्याच्या वडिलांना सहन झाला नाही.

प्रकृती बिघडल्याने १३ सप्टेंबरला त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र १४ सप्टेंबरला सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये ते सेवक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. ‘गणेश निर्दोष आहे, या एकूणच प्रकरणात त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतांना त्यांना अटक केली आहे’, असे त्याच्या मित्रपरिवाराचे म्हणणे आहे.


Multi Language |Offline reading | PDF