गुरुदेवा, आपल्या कृपेविण हा पामर आहे भिकारी ।

परात्पर गुरु डॉ. अाठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सौ. प्रमिला केसरकर

गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, या दीनाची एक विनवणी ।

गुरुकृपेचा कण पडावा, या आेंजळीत एकतरी ॥ १ ॥

तू आहेस चैतन्याने भरलेला आणि प्रीतीने अखंड ओथंबलेला ।

प्रीतीचा आणि चैतन्याचा कण पडावा, या आेंजळीत एकतरी ॥ २ ॥

स्थूल देहाने तू दिसतोस रामनाथी ।

मात्र मनाने करत आहेस, गुरूंसमवेत सफर सप्तलोकी ।

सप्तपाताळी आणि अखंड ब्रह्मांडाची ॥ ३ ॥

या दीनाची एक विनवणी आजच्या शुभदिनी ।

घे दान अहंचे आणि दे मजला अखंड शरणागती ॥ ४ ॥

देवा, तुझ्या कृपेविण हा पामर आहे भिकारी ।

घाल भीक त्याच्या आेंजळीत भावभक्तीची ॥ ५ ॥

‘गुरुदेवा, गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सुचलेल्या या कवितांमुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘ती अशीच टिकून राहो’, अशी आपल्या सुकोमल चरणी अखंड प्रार्थना !’

– सौ. प्रमिला रामदास केसरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now