भाजपने राममंदिर उभारले नाही, तर प्रभु श्रीराम जे करतील त्याचा आपण कधी विचार करू शकत नाही ! – साध्वी प्राची

राममंदिर लोकशाही राज्यात नव्हे, तर हिंदु राष्ट्रातच उभारले जाईल !

अयोध्या – आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्ही राममंदिराच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाची वाट पहात आहोत. वर्ष २०१९ पर्यंत राममंदिर उभारले गेले पाहिजे. त्यासाठी वर्ष २०१९ च्या निवडणुकाही टाळल्या जाऊ शकतात. जर वर्ष २०१९ पूर्वी भाजप राममंदिर उभारत नसेल, तर मला वाटते की, प्रभु श्रीराम जे काही करतील, त्याचा विचार आपण करू शकत नाही, अशी चेतावणी साध्वी प्राची यांनी येथे दिली. त्या रामललाच्या दर्शनासाठी येथे आल्या असतांना पत्रकारांशी बोलत होत्या.

१. साध्वी प्राची असेही म्हणाल्या की, ज्या वेळी रामभक्त आळस झटकून उभे रहातील त्या दिवशी राममंदिर उभारले जाईल. आमचे श्रीराम तंबूमध्ये आहेत, तर नेते वातानुकूलित खोलीत झोपा काढत आहेत. सरकारने रामभक्तांची परीक्षा घेऊ नये, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

२. साध्वी प्राची यांनी रामललाच्या दर्शनाच्या वेळी त्यांना झालेल्या अडचणीविषयी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, माझ्यासारख्या व्यक्तीला इतका त्रास होऊ शकतो, तर सामान्य भक्तांना किती त्रास होत असेल ? याविषयी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF