(म्हणे) ‘केरळमधील मंदिरांची संपत्ती विकून ती रक्कम पूरग्रस्तांना द्या !’ – भाजपचे खासदार डॉ. उदित राज

मंदिरांची संपत्ती मंदिरांची आहे, ती उधळण्यासाठी नाही !

भाजपमध्ये असे खासदार आहेत, हे भाजपला लज्जास्पद ! त्यांच्या या ट्वीटला भाजपकडून अद्याप कोणताही विरोध करण्यात आलेला नाही, यावरून भाजपची एकूण मानसिकताही लक्षात येते, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

मशीद आणि चर्च यांची मालमत्ता विकून ती रक्कम पूरग्रस्तांना देण्याविषयी डॉ. उदित राज आवाहन करतील का ?   

नवी देहली – केरळच्या पद्मनाभ, शबरीमला आणि गुरुवायुर मंदिरांतील सोने आणि संपत्ती विकली, तर केरळमधील पूरग्रस्तांना साहाय्यासांठी आवश्यक २१ सहस्र कोटी रुपयांपेक्षा ५ पट अधिक पैसे जमा होतील. जनतेने रस्त्यावर उतरून यासाठी मागणी केली पाहिजे. मंदिरामध्ये पडून असलेली संपत्ती नाहीतरी काय कामाची ?, असे ट्वीट देहलीतील भाजपचे खासदार डॉ. उदित राज यांनी केले आहे. डॉ. उदित हे ‘ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ एस्सी/एस्टी ऑर्गनायजेशन्स’चे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत.

डॉ. उदित यांच्या या ट्वीटनंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. ‘डॉ. उदित चर्च आणि मशिद यांच्या किंवा वक्फ बोर्डाच्या संपत्तीविषयी असे आवाहन का करत नाहीत ?’, तसेच ‘ते स्वतःची संपत्ती सैन्यासाठी दान का करत नाहीत ?’, असे प्रश्‍न त्यांना विचारले जात आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now