पाक आणि चीन यांच्या तुलनेत भारताकडे अपुरा शस्त्रसाठा ! – वायूदलप्रमुख बी.एस्. धनोआ

ही तूट भरून काढण्यासाठी भाजप सरकारने ४ वर्षांत काय केले ?, हे जनतेला समजायला हवे !

अशा स्थितीत भारताचे संरक्षण कसे होणार ? या स्थितीला सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

नवी देहली – जगात भारताला भेडसावणार्‍या समस्यांप्रमाणेच समस्या असणारे देश खूप अल्प आहेत. आपल्या दोन्ही बाजूला अण्वस्त्रधारी देश (पाक आणि चीन) आहेत. त्या तुलनेत आपल्याकडील शस्त्रसाठा अपुरा आहे. अशा परिस्थितीत राफेल विमाने आणि रशियाकडून घेण्यात येणारी एस – ४०० ही अत्याधुनिक अवकाश सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली यांंमुळे वायूदलाच्या सामर्थ्यात भरच पडेल, असे प्रतिपादन वायूदलप्रमुख बी.एस्. धनोआ यांनी येथे केले.

धनोआ पुढे म्हणाले की, राफेल विमानांमुळे वायूदलाला सध्याच्या समस्यांवर मात करण्यास साहाय्य होईल. वायूदलाकडे असणारी शस्त्रांंची कमतरता बर्‍याच अंशी भरून निघेल. सध्या वायूदलामध्ये लढाऊ विमानांच्या ३१ तुकड्या आहेत. आपल्याला ४२ तुकड्यांची आवश्यकता आहे. या ४२ तुकड्या जरी झाल्या, तरी आपण आपल्या २ मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागेच असू.


Multi Language |Offline reading | PDF