श्री गणेशोत्सवापर्यंत अधिकाधिक ठिकाणी ‘श्री गणेशमूर्तीचे दान करू नका’, ही ध्वनीचित्र-चकती दाखवा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

‘१३.९.२०१८ या दिवशी ‘श्री गणेशचतुर्थी’ आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्त नंतर विसर्जन करतात. काही धर्मद्रोही संघटना धर्मशास्त्र लक्षात न घेता कथित पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास विरोध करतात आणि ‘श्री गणेशमूर्तीचे दान करा !’ अशी चळवळ राबवतात. प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री गणेशमूर्तीचे दान करणे अशास्त्रीय आहे. त्यामुळे या संदर्भात श्री गणेशभक्तांचे प्रबोधन करण्यासाठी सनातन संस्थेने मराठी भाषेतील ध्वनीचित्र-चकतीची (सी.डी.ची) निर्मिती केली आहे. जिल्हासेवकांनी ती सर्व भाविकांना दाखवण्याचे नियोजन करावे.

१. धर्मशिक्षणवर्ग, हिंदू अधिवेशने, हिंदूसंघटन मेळावे आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम यांच्या वेळी ही ध्वनीचित्र-चकती दाखवून श्री गणेशभक्तांचे प्रबोधन करता येईल.

२. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून ही ध्वनीचित्र-चकती दाखवू शकतो.

३. हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने आदी माध्यमांतून धर्मकार्याशी जोडले गेलेेेले आणि धर्मसेवा करण्यास इच्छुक असलेले श्री गणेशभक्त, धर्मप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांना आसपासच्या गावांत ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्याची विनंती करावी.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now