हिंदुत्ववाद्यांनो, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार रोखण्याचा कृतीशील संकल्प करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आजकाल गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी धार्मिक उत्सवांत पुढील प्रकारचे अपप्रकार सर्रास केले जात असल्याचा अनुभव सर्वांना येत असतो.

१. वर्गणीसाठी बळाचा वापर

२. ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ची अशास्त्रीय (विडंबनात्मक) आणि अवाढव्य मूर्ती बसवणे

३. भव्य मंडप, खर्चिक कृत्रिम सजावट आणि विद्युत लखलखाट

४. मंडपात जुगार खेळणे आणि मद्यपान करणे, तसेच चित्रपटगीते लावून ध्वनीप्रदूषण

५. वाद्यवृंद, चित्रपटनृत्य स्पर्धा आदी संस्कृतीहीन कार्यक्रम

६. विसर्जन मिरवणुकीत गुलाल बळाने लावणे किंवा प्रचंड प्रमाणात उधळणे, तसेच मद्यपान करून हिडीस नाच करतांना महिलांशी असभ्य वर्तन करणे आणि फटाके वाजवणे

अशा कृत्यांमुळे धर्महानी तर होतेच, तसेच पुढील पिढीवरही तसे संस्कार होतात. हिंदुत्ववाद्यांनो, ‘घरातील कचरा प्रथम काढावा’, या उक्तीनुसार जन्महिंदूंकडून धार्मिक उत्सवांत केली जाणारी धर्महानी रोखण्यासाठी या वर्षीपासूनच प्रारंभ करण्याचा कृतीशील संकल्प करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now