(म्हणे) ‘एकाही बांगलादेशी घुसखोराला भारतात राहू देणार नाही !’ – अमित शाह

गेल्या साडेचार वर्षांत केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत असतांना घुसखोरांना हाकलू न शकणारा भाजप आता निवडणुकीच्या तोंडावर असे बोलून हिंदूंना पुन्हा मूर्ख बनवण्याचाच प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

जयपूर (राजस्थान) – भाजपने संकल्प केला आहे की, एकही बांगलादेशी घुसखोराला देशात राहू देणार नाही. एकेकेला शोधून बाहेर काढले जाईल, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. या वेळी त्यांना आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीविषयी भूमिका मांडली. तसेच त्यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून आलेले हिंदू हे घुसखोर नसून शरणार्थी आहेत. त्यांना भारताची नागरिकता देण्यात येईल, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF