पॅरिसमध्ये चाकूने आक्रमण करणार्‍या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक

पॅरिस – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ९ सप्टेंबरच्या रात्री एका अज्ञात आक्रमणकर्त्याने ‘डेल ऑर्के’ या कालव्याच्या शेजारी फिरणार्‍या लोकांवर चाकूने  केलेल्या आक्रमणात ७ जण घायाळ झाले. घायाळांमध्ये २ ब्रिटीश पर्यटकांचाही समावेश आहे. घायाळांपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी अफगाणिस्तानच्या एका संशयीत नागरिकाला अटक केली आहे. ‘हे आतंकवादी आक्रमण आहे का?’, याचा शोध पोलीस घेत आहेत. फ्रान्समध्ये पूर्वीही अशाच प्रकारची आक्रमणे झाली असून ती इस्लामिक स्टेटकडून करण्यात आली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now