भारतात चालू असलेल्या एकत्रित सैन्य सरावात सहभागी होण्यास नेपाळचा नकार

आता छोटासा नेपाळही भारताला ठेंगा दाखवत आहे ! हा भारताच्या परराष्ट्रनीतीचा पराभव होय !

काठमांडू – १० सप्टेंबरपासून ‘बिम्सटेक’ (बे ऑफ बंगाल इनीशिएटिव फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल एंड इकनॉमिक को-ऑपरेशन) देशांच्या भारतातील पुणे येथे चालू झालेल्या पहिल्या सैन्य सरावाला नेपाळने ऐनवेळी सहभागी होण्यास नकार दिला आहे. ‘नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर तेथील सरकारने हा निर्णय घेतला’, असे म्हटले जात आहे. बिम्सटेकमध्ये भारत, भूतान, नेपाळ, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका हे देश सहभागी आहेत. या देशांनी एकत्र सैन्य सराव आयोजित केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF