धर्माविषयी चुकीची शिकवण देऊन मनुष्याच्या पतनास कारणीभूत होणारा एक पंथ, तर धर्माविषयी योग्य शिकवण देऊन मनुष्याचा उद्धार करणारा महान हिंदु धर्म !

पू. संदीप आळशी

‘मनुष्याने जीवनात कितीही चुका किंवा अयोग्य कर्मे केली, तरी मृत्यूपूर्वी एकदा धर्मगुरूंकडे जाऊन स्वतःच्या चुका किंवा अयोग्य कर्मे यांची कबुली दिली, तर त्या मनुष्याची सर्व पापे क्षमा होतात’, अशी एका पंथाची शिकवण आहे. हिंदु धर्मात ‘कर्मफलसिद्धांत’ सांगितला आहे. यानुसार प्रत्येक चूक किंवा अयोग्य कर्म यामुळे पाप हे लागतेच. हे पाप केवळ क्षमायाचना करून नष्ट होत नाही, तर पापाचे फळ या अथवा पुढील जन्मी दुःख किंवा भोग यांच्या स्वरूपात भोगावे लागते. पापांच्या या परिणामांपासून वाचण्यासाठी, म्हणजेच पापांचे क्षालन होण्यासाठी हिंदु धर्मात उपायही सांगितले आहेत. या अंतर्गत विविध प्रायश्‍चित्त कर्मे सांगितली आहेत, तसेच जीवनात नेहमी सत्कर्मे आणि साधना करण्याचा उपदेश केला आहे. साधनेने एखाद्याची वृत्ती सात्त्विक झाली की, त्याच्या हातून अयोग्य कर्मे घडतच नाहीत.

धर्माविषयी चुकीची शिकवण देऊन मनुष्याला आयुष्यभर पापकर्मे करण्याची जणू अनुमती देणारा एक पंथ कुठे आणि धर्माविषयी योग्य शिकवण देऊन मनुष्याला पापकर्मे करण्यापासून सावध करून अन् पापक्षालनाचा उपायही सांगून त्याच्या जीवनाचा उद्धार करणारा महान हिंदु धर्म कुठे !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१३.९.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF