शिकागो (अमेरिका) येथील विश्‍व हिंदु संमेलनामध्ये पुरोगामी संघटनेकडून गोंधळ

शिकागो – येथे पार पडलेल्या विश्‍व हिंदु संमेलनामध्ये बनावट ओळखपत्रांद्वारे घुसखोरी करून येथील ‘साउथ एशियन फॉर जस्टीस’ या संघटनेच्या ५ महिला आणि एक पुरुष कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. (बनावट ओळखपत्र बनवून कार्यक्रमात घुसणे हा गुन्हा नाही का ? पुरोगामी संघटनांचा हाच का विवेकवाद ? – संपादक) हे कार्यकर्ते ‘हिंदु कट्टरतावाद थांबवा’, अशा घोषणा देत होते. तसेच त्यांनी निषेधाचे कापडी फलकही फडकवले. त्या वेळी त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला. (हिंदू कट्टरवादी असते, तर हिंदूंच्या कार्यक्रमात पुरोगाम्यांना असा गोंधळ घालण्याची संधी मिळाली असती का ? धर्मांधांच्या कार्यक्रमात पुरोगाम्यांनी असा गोंधळ घालण्याचे धारिष्ट्य दाखवले असते का ? – संपादक) संमेलनाच्या आयोजकांनी सांगितले की, त्यांना गोंधळ घातल्यानंतर सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले होते. त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now