इजिप्तमध्ये ‘मुस्लिम ब्रदरहुड’ या आतंकवादी संघटनेच्या ७५ जणांना फाशी, तर ४७ जणांना जन्मठेप

इजिप्तसारख्या इस्लामी राष्ट्रात आतंकवादी संघटनांच्या सदस्यांना फाशी देण्यात येते. या उलट भारतात मात्र आतंकवाद्यांच्या विरोधात वर्षानुवर्षे खटले चालवून त्यांना पोसले जाते !

कैरो (इजिप्त) – येथील न्यायालयाने वर्ष २०१३ मध्ये करण्यात आलेल्या देशविरोधी आंदोलनाच्या प्रकरणी ‘मुस्लिम ब्रदरहुड’ या आतंकवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांसहित ७५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच ४७ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या सर्वांवर हत्या आणि संपत्तीची हानी करणे, असे आरोप होते. या हिंसाचारी आंदोलनामध्ये ६०० जणांचा मृत्यू झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF