इंधन दरवाढ सरकारमुळे नाही, तर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे ! – भाजप सरकार

आंतरराष्ट्रीय कारणे असतील, तर जगातील अन्य देशांमध्येही इंधन दरवाढ झाली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात तसे दिसत नाही, असे का ? याचे उत्तर भाजप सरकार का देत नाही ?

नवी देहली – इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाहीत, तर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाचे भडकलेले भाव याला कारणीभूत आहेत. आमच्या सरकारने महागाई न्यून करण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. वर्ष २०१४ मध्ये आम्ही सत्तेवर येण्याआधी काँग्रेसच्या काळात महागाईचा दर १०.४ टक्के होता, जो आता ४.७ टक्क्यांंवर आला आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद दिले. ‘ही गोष्ट जनतेला ठाऊक आहे; म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या ‘भारत बंद’ला प्रतिसाद दिलेला नाही’, असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले.

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, देशात बंद करण्याचा, आंदोलन पुकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र आज जो बंद पुकारला जात आहे त्यात देशाची हानी होत आहे. बिहारमध्ये बंदमुळे उपचारार्थ रुग्णालयात पोहोचायला विलंब झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. बसगाड्या जाळल्या जात आहेत. पेट्रोल पंपांची तोडफोड केली जाते आहे. या सगळ्या परिस्थितीला कोण उत्तरदायी आहे ?, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

जनतेचा भडका उडेल, इतकीही इंधनाची दरवाढ नको ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा भाजपला घरचा अहेर

इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार त्यांच्या पक्षातील अर्थतज्ञ असणारे डॉ. स्वामी यांचा सल्ला घेत नाही का ?

नवी देहली – मला वाटते की, अर्थशास्त्रानुसार पेट्रोलच्या किमती या ४० रुपये असायला हव्यात. पंतप्रधानांनी पेट्रोलियम मंत्र्यांना सांगितले पाहिजे की, त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाप्रमाणे नव्हे, तर अर्थ मंत्रालयाप्रमाणे विचार करायला हवा. त्यांनी पेट्रोलच्या किमती इतक्याही वाढवू नयेत की, लोकांचा भडका उडून ते रस्त्यावर उतरतील, असा सल्ला भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी त्यांच्या पक्षाच्या सरकारला दिला.

डॉ. स्वामी यांनी पुढे म्हटले की, जेव्हा क्रूड ऑईलच्या किमती वाढतात, तेव्हा इंधनाच्या किमती वाढल्या पाहिजेत, हे ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ आहे आणि मी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाजूने नाही; कारण यात केवळ २ लोकांचा (उत्पादक आणि विक्रेता) समावेश असतो; पण येथे संपूर्ण अर्थव्यवस्था सहभागी आहे. त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now