केरळमधील काँग्रेसच्या ख्रिस्ती आमदाराकडून बिशपने बलात्कार केलेल्या ननचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख !

  • सध्या भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘आवडलेल्या मुलीने विवाहास नकार दिल्यावर तिला पळवून आणून तुम्हाला देवू’, अशा आशयाचे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसींनी त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. हेच काँग्रेसवाले आता त्यांच्या आमदाराने एका बलात्कारपीडित ननविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यावर कुठे दडी मारून बसले आहेत ?
  • या वृत्ताचे प्रसारण भारतातील प्रसारमाध्यमे का करत नाहीत ? बिशपपदावर कार्यरत असलेल्या पाद्रयावर नन गंभीर आरोप करून आंदोलन करत असतांना हिंदूंच्या संतांवर असे कथित आरोप झाल्यावर आकांडतांडव करणार्‍या प्रसारमाध्यमांना ती ‘ब्रेकिंग न्यूज’ वाटत नाही का ?
केरळचे काँग्रेसचे आमदार पी. सी. जॉर्ज

थिरुवनंतपूरम् – एका ननने सध्या पंजाबमधील जालंधर येथे कार्यरत असलेले बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केली आहे आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्या न्यायालयातही जाणार आहेत. यावर केरळचे काँग्रेसचे आमदार पी. सी. जॉर्ज यांनी ‘ननच्या वेश्या असण्यावर कुणालाही काही शंका नाही. १२ वेळा तिने शरीरसुखाचा आनंद घेतला. त्यानंतर १३ व्या वेळी बलात्कार झाल्याचा आरोप कसा केला ? तिने आधीच तक्रार का नाही केली ?’ असा प्रश्‍न विचारला आहे. जॉर्ज यांच्या विधानावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी टीका केली आहे. ‘जॉर्ज यांच्यावर कारवाई करण्यासाठी केरळच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार आहे’, असे त्या म्हणाल्या.

भारतातील कॅथलिक चर्चच्या इतिहासातील पहिलीच घटना

बिशपच्या विरोधात नन्सकडून आंदोलन

केरळमधील कॅथलिक चर्चच्या इतिहासात प्रथमच ननच्या एका गटाने बिशप फ्रँको मुलक्कल, चर्चचे अधिकारी आणि पोलीस यांच्या विरोधात निषेध करण्यासाठी कोची येथील महानिरीक्षक कार्यालयाजवळील विंची चौकात आंदोलन केले आणि त्यांनी बिशप फ्रँको मुलक्कल याच्या अटकेची मागणी केली. हे आंदोलन ‘संयुक्त ख्रिश्‍चन कौन्सिल’ या संघटनेकडून आयोजित करण्यात आले होते. त्यात बिशप फ्रँको मुलक्कल याच्या थ्रिशूर या शहरातील नन्सचा समावेश होता. काही नन्सनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ननने केलेल्या तक्रारीनंतर अनेक नन्सनीही या बिशपने त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली होती. ‘बिशपना राजकीय पाठिंबा असल्यामुळे त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही’, असा आरोपही नन्सनी केला आहे.

चर्च, माकप सरकार आणि पोलीस यांनी न्याय दिला नाही ! – सिस्टर अनुपमा

चर्चने आम्हाला न्याय दिला नाही. पोलीस आणि सरकार यांनीही नोंद घेतली नाही. आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.  या चर्चमुळेच आम्हाला रस्त्यावर यावे लागले, असा संताप आंदोलनकर्ता सिस्टर अनुपमा एम्.जे. यांनी या वेळी केले. या आंदोलनावर प्रतिक्रिया देतांना केरळ कॅथलिक बिशप परिषदेचे प्रवक्ते फादर वर्गीस वेल्लिकट्टा यांनी सांगितले की, जर आरोपांमध्ये सत्य असेल, तर त्याविषयी तक्रारी करण्यास चर्चमध्येच योग्य व्यासपीठ आहे. (तक्रारी करण्यासाठी पोलीस आणि न्याययंत्रणा असतांना त्याच्यावर पाद्री का विश्‍वास ठेवत नाहीत ? अमेरिकेतील पेनसिल्वेनिया येथे गेली ७० वर्षे पाद्रयांच्याकडून मुलांचे लैंगिक शोषण केले जात होते. याची तक्रार व्हॅटिकनपर्यंत करण्यात आली; मात्र पाद्रयांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच येथेही अपेक्षित आहे, असे पाद्रयांच्या म्हणण्यावरून लक्षात येते ! – संपादक)

माकपच्या आमदारावरील लैंगिक शोषणाची नोंद घेण्यास केरळच्या राज्य महिला आयोगाच्या प्रमुख जोसेफिन यांचा नकार

  • माकपऐवजी भाजप किंवा एखाद्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या लोकप्रतिनिधीवर असा आरोप झाला असता, तर जोसेफिन यांनी लगेच त्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता !
  • राज्य महिला आयोग हा सत्ताधारी माकपचा बटिक आहे का ?

थिरुवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) आमदार पी.के. ससी यांच्यावर एका महिलेने गेल्या आठवड्यात लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावर केरळच्या राज्य महिला आयोगाच्या प्रमुख एम्.सी. जोसेफिन यांनी आमदार ससी यांची बाजू घेतली आहे. ‘आपणही मनुष्य आहोत. चुका होऊ शकतात. पक्षात असणार्‍यांकडून चुका होऊ शकतात’, असे सांगत त्यांनी ससी यांच्या विरोधात तक्रार न आल्याने कारवाई करण्यास नकार दिला. ‘तसेच माकप स्वतःहून या प्रकरणावर चौकशी करत आहे’, असे जोसेफिन यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची नोंद घेत केरळ पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले आहे.

कठुआ (जम्मू) येथील वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

पाद्रयांच्याकडून केले जाणारे लैंगिक शोषण एका देशापुरते मर्यादित नसून ते जगभर होत आहे आणि भारतीय प्रसारमाध्यमे मात्र त्यावर मौन बाळगून आहेत !

कठुआ (जम्मू) – येथील वसतीगृहात रहाणार्‍या मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाद्य्राच्या विरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. येथून सुटका करण्यात आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांनी स्वतःकडे सोपवण्याची मागणी केली आहे. पडताळणी केल्यानंतर मुलांना पालकांच्या कह्यात देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. हे वसतीगृह चर्चच्या नावावर चालू करण्यात आले होते. संबंधित चर्चने ते वसतीगृह त्याचे नाही, असे म्हटले आहे.

केरळच्या कॉन्व्हेंट शाळेतील विहिरीमध्ये ननचा मृतदेह सापडला

कोल्लम (केरळ) – येथील ‘सेंट स्टीफेंस स्कूल’ या शाळेतील ५५ वर्षीय नन सुजन मॅथ्यू यांचा मृतदेह माउंट टाबोर कॉन्व्हेंटच्या विहिरीत आढळून आला. पोलिसांच्या मते, कॉन्व्हेंटच्या कर्मचार्‍यांनी विहिरीजवळ रक्ताचे डाग पाहिले. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी ननचा मृतदेह विहिरीत तरंगतांना पाहिला. (हा मृत्यू संशयास्पद असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now