नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जळगाव येथून दोघांना अटक

जळगाव – नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने येथील साकली गावातील दोघांना अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावे आहेत. ९ सप्टेंबरला या दोघांनाही सुट्टीकालीन न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत एटीएस्ची कोठडी देण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी सूर्यवंशी यांनी वाहनाची व्यवस्था केल्याचा आतंकवादविरोधी पथकाला संशय आहे, असे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF