अमेरिकेत बँकेमधील गोळीबारात एका भारतियासह तिघांचा मृत्यू

पोलिसांच्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार

अमेरिकेत भारतीय असुरक्षित !

ओहियो (अमेरिका) – सिनसिनाटी शहरातील एका बँकेत एका बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात  पृथ्वीराज कांदेपी या भारतीय तरुणासह अन्य २ जणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी गोळीबार करणार्‍याला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण तो ऐकत नसल्याने त्याला गोळी घालून ठार करण्यात आले. अद्याप या गोळीबारामागील कारण समोर आलेले नाही. ओमर एनरिक सँटा पेरेज असे गोळीबार करणार्‍याचे नाव होते.

 

 


Multi Language |Offline reading | PDF