आतंकवाद्यांवर कारवाई न केल्याने अमेरिकेने पाकला देण्यात येणारे २ सहस्र १०० कोटी रुपयांचे साहाय्य रोखले

केवळ आर्थिक साहाय्य रोखून काय होणार ? त्यापेक्षा अमेरिकेने स्वतः पाकमध्ये कारवाई करून आतंकवाद्यांना नष्ट करून दाखवावे !

वॉशिंग्टन – अमेरिकेने पाकला देण्यात येणारे सुमारे २ सहस्र १०० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य रोखले आहे. आतंकवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. या पैशाचा वापर इतर कामांसाठी केला जाईल, असे, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी सांगितले.

अमेरिकेच्या या निर्णयाच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते की, पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत; मात्र अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही. तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रहित केले जातील, अशी चेतावणी पत्रकार परिषदेत दिली होती.


Multi Language |Offline reading | PDF