
लीथ (ब्रिटन) – स्कॉटलॅण्डमधील लीथ शहरातील गुरुद्वारा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी ४९ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुरुनानक गुरुद्वारा साहिबला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लावण्यात आली. त्यासाठी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. अग्नीशमन दलाच्या २० बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत गुरुद्वाराची मोठी हानी झाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.