परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्याच्या हालचाली चालू असल्याचे धादांत खोटे वृत्त प्रसारित !

‘टीव्ही ९ मराठी’ वाहिनीकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

मुंबई – डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला ‘लक्ष्य’ करून अत्यंत हीन पातळीवर अपकीर्ती करण्याचा सपाटाच प्रसारमाध्यमांनी लावला आहे. एकाही प्रकरणात सनातन दोषी नसतांना ‘टीव्ही ९ मराठी’ सारख्या वृत्तवाहिन्यांकडून कपोलकल्पित कहाण्या रचून धादांत खोटी वृत्ते ‘स्पेशल रिपोर्ट’च्या नावाखाली प्रसारित केली जात आहेत. ३० ऑगस्ट या दिवशी ‘टीव्ही ९ मराठी’ वाहिनीने ‘‘तो’ महाराष्ट्रातून एम्पीला पळून जाणार ?’ या शीर्षकाखाली एक विशेष रिपोर्ट प्रसारित केला. त्यामध्ये ‘गोव्यातील सनातनच्या आश्रमात डॉ. आठवले यांच्यावर कोणत्याही क्षणी एटीएस्कडून (आतंकवाद विरोधी पथकाकडून) कारवाई होऊ शकते; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भाजपशासित राज्यांमध्ये हालवण्याच्या हालचाली चालू आहेत. त्यातल्या त्यात मध्यप्रदेशमधील इंदूर हे ठिकाण अधिक सुरक्षित असल्याने लवकरच त्यांना मध्यप्रदेश येथे हालवण्यात येणार आहे’, असे अत्यंत खोटे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. या विद्वेषी वृत्ताविषयी ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.


Multi Language |Offline reading | PDF