टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी, तिचे मुख्य संपादक आणि संचालक यांना अभय वर्तक आणि विवेक नाफडे यांच्याकडून कायदेशीर नोटीस

सनातनचे धर्मप्रचारक अभय वर्तक आणि साधक विवेक नाफडे यांच्याविषयी अपकीर्तीकारक वृत्त प्रसारित केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा) – २६ ऑगस्ट २०१८ या दिवशी टी.व्ही. ९ या मराठी वृत्तवाहिनीवरून ‘अणदुरेचं लंकेश हत्या कनेक्शन?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करतांना ‘कोण कोण अंडरग्राऊंड? अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन; विवेक नाफडे, प्रवक्ता, सनातन आणि इतर संशयित देश सोडून फरार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे’, असे वृत्त प्रसारित करून सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि सनातनचे साधक श्री. विवेक नाफडे यांची अपकीर्ती करून मानहानी केली. त्यामुळे श्री. नाफडे आणि श्री. वर्तक यांनी टी.व्ही. ९ मीडिया महाराष्ट्र, तिचे मुख्य संपादक रंजीत कुमार जम्मीगुम्पुला आणि संचालक क्लिफर्ड परेरा यांना स्वतंत्रपणे कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २७ ऑगस्ट २०१८ या दिवशी ही कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्याकडून १० लाख रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी केली आहे, तसेच या मागणीची पूर्तता नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत न झाल्यास पुढील कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागेल, असे या नोटिशीतून बजावले आहे. या कायदेशीर नोटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF