श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा !

सर्वत्रच्या साधकांना सूचना !

‘१३.९.२०१८ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र श्री गणेशाची आराधना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सनातन संस्थेने गणपतीविषयीचे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच गणेशतत्त्वाची अनुभूती देणारी गणेशाची चित्रे आणि नामजप-पट्ट्या यांची निर्मिती केली आहे. गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

१. सनातनने प्रकाशित केलेले लघुग्रंथ आणि ग्रंथ यांमधील बहुमोल ज्ञान

१ अ. सात्त्विक गणेशमूर्तीची माहिती देणारा लघुग्रंथ – ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !’ : सनातनच्या मूर्तीकार साधकांनी संकलित केलेल्या या लघुग्रंथात ‘गणेशचतुर्थीच्या दिवशी पुजावयाची मूर्ती कशी असावी ? सात्त्विक श्री गणेशमूर्तीमुळे कोणते लाभ होतात ?’, याचे विवेचन केले आहे. १२.८.२०१८ पासून श्रावण मासाला आरंभ झाला असून या मासात बहुतांश गणेशभक्त श्री गणेशमूर्तीची मागणी मूर्तीकारांना देतात. त्यामुळे साधकांनी या लघुग्रंथाच्या वितरणासाठी अधिकाधिक प्रयत्न केल्यास समाजापर्यंत ही माहिती पोहोचून त्यांना सात्त्विक श्री गणेशमूर्तीची मागणी करता येईल.

१ आ. गणेशपूजनाची समग्र माहिती देणारा लघुग्रंथ – ‘श्री गणेश पूजाविधी’ : या लघुग्रंथात श्री गणेशचतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह दिले आहेत. त्याचप्रमाणे ‘श्री गणेशाचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन कसे करावे ? पूजकाला गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी काय करावे ?’ आदी माहिती सविस्तर दिली आहे.

१ इ. श्री गणेश अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र : श्री गणेश अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र ही स्तोत्रे प्रचलित असून अनेक जण ती नियमितपणे म्हणतात. स्तोत्राची फलश्रुती उच्चारांवर अवलंबून असते. या लघुग्रंथात स्तोत्रातील संस्कृत शब्दांची समर्पक फोड केली असून त्यामुळे शब्दांचा योग्य उच्चार कसा करावा, हे कळणे सोपे जाते. या लघुग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्राचा मराठीतील अर्थही दिला आहे. अर्थ कळल्याने भाविकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.

१ ई. ‘गणपतीची उपासना कशी करावी ?, हे विशद करणारा ग्रंथ – ‘श्री गणपति’ : यात गणपतीची विविध नावे, त्याचे कार्य आणि वैशिष्ट्ये, मूर्तीच्या काही वैशिष्ट्यांचा भावार्थ दिला आहे. ‘गणपतीची उपासना कशी करावी ?, सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, हेही या ग्रंथात विशद केले आहे. (याचा लघुग्रंथही उपलब्ध आहे.)

२. सनातनची अन्य सात्त्विक उत्पादने

२ अ. श्री गणेशाचे चित्र : या चित्रामध्ये २८.३ टक्के गणेशतत्त्व आकृष्ट झाले आहे. (कलियुगात मूर्ती किंवा चित्र यांमध्ये अधिकाधिक ३० टक्के एवढ्या प्रमाणातच देवतेचे तत्त्व येऊ शकते.) हे चित्र लहान, मध्यम आणि मोठ्या या आकारांमध्ये आहे, तसेच ‘दत्त-गणपति’ या देवतांचे चित्र असलेले पदकही (लॉकेटही) उपलब्ध आहे.

२ आ. नामपट्टी : अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने ‘॥ ॐ गँ गणपतये नमः ॥’ या नामजपाची पट्टी बनवली आहे.

३. आकर्षक भेटसंच बनवा !

बरेच उद्योगपती आणि विक्रेते गणेशचतुर्थीच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतात. त्यांना सात्त्विक वस्तूंची भेट देणे सोयीस्कर व्हावे, यासाठी वरील ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवता येतील.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (१३.८.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF