बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी करू देणार नाही !

बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांवर गदा येऊ नये, यासाठी ममता बॅनर्जी यांचा राष्ट्रघातकी निर्णय !

  • बांगलादेशी घुसखोरांसाठी आसामनंतर माहेरघर ठरलेल्या बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी झालीच पाहिजे, याला विरोध करणार्‍या राष्ट्रघातकींना केंद्र सरकारने कारागृहात डांबले पाहिजे !

नवी देहली – आम्ही बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी करण्याची अनुमती देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्यांनी आरोप केला की, भाजप बंगालमध्ये हत्यांवरून राजकारण करत आहे. यापूर्वीही ममता बॅनर्जी यांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून टीका केली होती.


Multi Language |Offline reading | PDF