(म्हणे) ‘सनातन हिंदुत्ववादी आतंकवादी संघटना; गोळी घालणार्‍यांसमवेत मास्टरमाईंड जयंत आठवले यांनाही अटक करावी !’

‘भारत बचाओ’ आंदोलनाच्या पत्रकार परिषदेमध्ये मागणी !

पीत पत्रकारितेमुळे अनेक वाहिन्यांवरून बाहेर पडावे लागलेल्या निखिल वागळे यांची गरळओक !

देशातील सहस्रावधी नागरिकांचे बळी घेणारा इस्लामी आतंकवाद रोखण्यासाठी एकही पत्रकार परिषद न घेता अध्यात्मप्रसार आणि हिंदुत्व यांचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे म्हणजे हिंदूंची गळचेपी करण्याचा प्रकार होय !

मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – आतंकवादाला कोणता धर्म नसतो, मग धर्म केवळ सिमीला आहे का ? सनातन संस्था हिंदु संघटना आहे, असे मी मानत नाही. ही संघटना हिंदुत्वाचा अपमान करत आहे. तिला आपण हिंदुत्ववादी आतंकवादी म्हणू शकतो. ज्याप्रमाणे झाकीर नाईक याची संघटना आणि सीमी यांवर बंदी घालण्यात आली. त्याप्रमाणे सनातन संस्थेला आतंकवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी घालण्यात यावी. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रमुख अन् विवेकवाद्यांना गोळ्या घालणार्‍यांसमवेत मास्टरमाईंड डॉ. जयंत आठवले यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार निखिल वागळे यांनी २३ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या वेळी सनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्थेच्या सर्व प्रवक्त्यांचे अन्वेषण करण्याची मागणी या वेळी वागळे यांनी केली. ‘भारत बचाओ आंदोलन’ या संघटनेच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फिरोज मिठीबोरवाला, कम्युनिस्ट पक्षाचे चारूल जोशी, पत्रकार जतीन देसाई, जनता दल सेक्युलर पक्षाच्या ज्योती बडेकर, तुषार गांधी हे उपस्थित होते.

वागळे या वेळी म्हणाले की, वर्ष २०१० पासून मी सनातन संस्थेच्या आतंकवादी कारवायांचा अनुभव स्वत: घेत आहे. नालासोपारा येथे जे बॉम्ब, पिस्तुल आणि स्फोटके सापडली, अशा वस्तू घरामध्ये ठेवणे या आतंकवादी कारवाया आहेत. वर्ष २०१३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदु अधिवेशनाला शुभेच्छा संदेश दिला होता. ते आता सनातन संस्थेला वाचवणार का ? पोलिसांनी पनवेल येथील सनातनच्या आश्रमामध्ये घातलेल्या धाडीमध्ये काही आक्षेपार्ह औषधे सापडली आहेत. (सनातन निर्दोष असल्यामुळे तिला कुणी वाचवण्याचा प्रश्‍नच येत नाही. ज्यामध्ये काहीच तथ्य नाही, ते पनवेल आश्रमातील औषधांचे सूत्र येथे उपस्थित करणे म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढण्यासारखे आहे ! – संपादक)

 

(म्हणे) ‘शिवसेनेने पत्रक काढून सनातनला विरोध असल्याची भूमिका घोषित करावी !’

नालासोपारा येथील मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते. माझे शिवसेनेला जाहीर आवाहन आहे की, ते प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मानत असतील, तर त्यांनी सनातनला सहकार्य करू नये. शिवसेनेने पत्रक काढून सनातनला विरोध असल्याची भूमिका घोषित करावी. (शिवसेनेने काय करावे आणि काय करू नये, हे वागळे यांनी सांगण्याची आवश्यकता नाही ! शिवसेनेवर दबाव आणण्याचा हास्यास्पद प्रयत्न करून वागळे त्यांची असहिष्णूताच दाखवून देत आहेत ! – संपादक)

सर्व पुरोगाम्यांच्या संदर्भातही हेच विधान लागू होत नाही का ?

(म्हणे) ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती ही एकाच अजगराची १० तोंडे !’

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये सनातनचे साधक पकडले गेले आहेत. त्यांना शिक्षा झाली आहे. शिवप्रतिष्ठान, सनातन संस्था, श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती ही एकाच अजगराची १० तोंडे आहेत. सहिष्णु हिंदू समाजाला सनातनसारखी अतिरेकी संघटना नको आहे.

संत समाजाचा कशा प्रकारे उद्धार करत असतात, हे सनातनद्वेषाने पिवळे झालेल्या वागळे यांना काय कळणार ?

(म्हणे) ‘डॉ. जयंत आठवले समाजात विष पसरवत आहेत !’

आतापर्यंत झालेल्या अन्वेषणामध्ये कोणत्याही संघटनेचा हात असल्याचे अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या अन्वेषणामध्ये आढळलेले नाही, हे आतंकवादविरोधी पथकाने केलेले विधान १०० टक्के खोटे आहे. ते असे बोलूच कसे शकतात. तुमच्याकडे पुरावे नसतील, तर ते शोधा. मी तुम्हाला सनातनच्या आश्रमांत घेऊन जातो. अनेक पत्रकारांनी सनातनविषयी संशोधन केले आहे. त्यांच्याकडे पुरावे आहेत. डॉ. जयंत आठवले समाजात विष पसरवत आहेत.

आतंकवादविरोधी पथकावर आमचा विश्‍वास नाही !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने जी कारवाई केली आहे, ती कर्नाटक पोलिसांच्या माहितीवरून केली आहे. याच महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वी नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक केली होती; पुढेही काही नावे आली; तर मग आधी ज्यांना पकडण्यात आले ते कोण होते. त्यामुळे पोलिसांचे आधीचे बोलणे खोटे होते किंवा हे बोलणे तरी खोटे आहे. त्यामुळे आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्‍वास राहिलेला नाही.

हिंदु धर्मात आतंकवाद अस्तित्वात नसल्यानेे धार्मिक नव्हे, तर इस्लामिक दहशतवाद म्हणा !

(म्हणे) ‘धार्मिक आतंकवादाविषयी बोलणे आवश्यक !’  मिठीबोरवाला, सामाजिक कार्यकर्ता

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, शिवप्रतिष्ठान यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. देशात जो धार्मिक आतंकवाद चालू असलेला धार्मिक आतंकवाद धोकादायक आहे. मग तो हिंदू आतंकवाद असू दे, इस्लामिक आतंकवाद असो किंवा अन्य कोणत्या धर्मांचा आतंकवाद असू दे. त्याविषयी बोलणे आवश्यक आहे.

इस्लामिक आतंकवादाच्या विरोधात तथाकथित पुरोगामी पत्रकारांनी कधी एवढ्या पोटतिडकीने मागणी केल्याचे ऐकले आहे का ?

(म्हणे) ‘सनातनच्या बंदीसाठी रस्त्यावर येऊ !’  जतीन देसाई, पत्रकार

वर्ष २०११ केंद्रामध्ये सनातन बंदीचा प्रस्ताव पडून आहे. या सर्व संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या आहेत. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येची लिंक नालासोपार्‍याशी जोडलेली आहे. सनातन संस्थेवर शासनाने त्वरित बंदी घालावी. त्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ.


Multi Language |Offline reading | PDF