आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिमचा गुंड जबीर मोती याला लंडनमध्ये अटक

लंडन – आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा सर्वांत विश्‍वासू सहकारी असणारा गुंड जबीर मोती याला येथून अटक करण्यात आली आहे. जबीर याला पाकने त्याचे नागरिकत्व दिलेले आहे. इंग्लंड, संयुक्त अरब अमिरात आणि इतर देशांमध्ये चालू  असलेल्या दाऊदच्या काळ्या कारभारावर लक्ष ठेवण्याचे काम मोती करतो. तो दाऊद टोळीचा पैशासंबंधित व्यवहारही पहातो. बनावट भारतीय नोटा, अवैध शस्त्रास्त्रांचा  पुरवठा आणि मालमत्तेसंबंधित व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे कामही त्याच्याकडे होते. पैशांचा पुरवठा आतंकवादी संघटनांपर्यंत करण्याचे काम मोती याच्याकडे होते. त्याच्यावर अमली पदार्थांची तस्करी, खंडणी आणि इतर गुन्हांमध्ये गंभीर आरोप आहेत. (हा गुंड भारताच्या कह्यात आल्यावर भारताने त्याला पोसण्याऐवजी जलदगतीने खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now