देशातील स्वच्छ राजधानीचा पुरस्कार मिळवणार्‍या मुंबई महानगरपालिकेकडून केवळ ६५ टक्के कचर्‍याचेच वर्गीकरण !

बांगलादेशी घुसखोर आणि धर्मांध यांना रहायला मोकळीक देऊन मुंबईची लोकसंख्या अनियंत्रित केल्यावर वेगळे काय घडणार ?

मुंबई – येथे प्रतिदिन सिद्ध होणार्‍या अनुमाने ८ सहस्र मेट्रिक टन कचर्‍यापैकी केवळ ६५ टक्के कचर्‍याचेच वर्गीकरण महानगरपालिकेकडून करण्यात येते. २ वर्षांपूर्वी हे प्रमाण अवघे २७ टक्क्यांवर होते. १०० टक्क्यांच्या उद्दिष्टापासून महापालिका अजूनही दूर आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल २०१७-१८ मध्ये माहिती देण्यात आली आहे. कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्टही अनेक वर्षे ३२ टक्क्यांवरच राहिले आहे.  सुका कचरा वेगळा काढून त्यातील पुनर्वापरायोग्य वस्तू वेगळ्या काढणे, इलेक्ट्रॉनिक-रासायनिक, प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाटीसाठी वेगळी यंत्रणा राबवणे, तसेच ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती शक्य होते; मात्र काही ठिकाणी रहिवाशांनी ओला आणि सुका कचरा वेगळा केला, तरी तो घेऊन जाण्यासाठी महापालिकेकडून गाड्याच येत नसल्याच्या तक्रारी चालू आहेत. त्याचप्रमाणे पालिकेकडून केवळ कागदावरच कचरा वर्गीकरण चालू केल्याचाही आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF