अमेरिकेतील चर्चमधील ३०० पाद्य्रांकडून गेल्या ७० वर्षांत १ सहस्रपेक्षा अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण !

स्थानिक चर्च आणि व्हॅटिकन चर्च यांनी अनेक वर्षे प्रकरण दडपले !

  • ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये पाद्य्रांकडून होत असलेले लैंगिक शोषणाचे प्रकार किती जुने आणि संतापजनक आहेत, हे लक्षात येते; मात्र भारतातील एकाही प्रसारमाध्यमांनी इतक्या वर्षांत याविषयी वृत्त दिले नाही अथवा चर्चासत्रे आयोजित केली नाहीत; मात्र दुसरीकडे हिंदूंच्या संतांवरील खोट्या घटनांना आणि आरोपांना प्रसिद्धी देण्यात उत्साह दाखवला !
  • ख्रिस्ती पाद्य्रांचे हे खरे स्वरूप गेल्या काही दिवसांत केरळमध्येही दिसून आले; मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यावर चर्चा केली नाही !
  • भारतातील चर्चमध्ये असे प्रकार घडत आहेत का, याची चौकशी सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांनी पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे !

पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) – पेनसिल्व्हेनिया राज्यातील ६ केंद्रांतील कॅथलिक चर्चमध्ये गेल्या ७० वर्षांत ३०० पाद्य्रांनी अनुमाने १ सहस्र लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. ‘या संख्येत वाढही होऊ शकते’, असे सांगितले जात आहे. दीड वर्षाच्या चौकशीनंतर याचा अहवाल येथील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. ‘या घटनांना दडपण्याचा प्रयत्नही या पाद्य्रांनी केला होता’, असे यात म्हटले आहे. या अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. ‘अहवालातील नावे सार्वजनिक करू नयेत’, अशी मागणीही पाद्य्रांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली.

१. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार पेनसिल्व्हेनियामधील न्यायालयात या चर्चमधील अत्याचारांविषयीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यात वरील माहिती देण्यात आली आहे.

२. अ‍ॅटर्नी जनरल यांनी १ सहस्र पीडितांची ओळख पटवण्यात आल्याची माहिती दिली; मात्र न्यायाधिशांनी ‘पीडितांचा आकडा १ सहस्रपेक्षा अधिक असेल’, असे म्हटले आहे.

३. कॅथलिक चर्चमधील लैंगिक शोषणाविषयीचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा अहवाल आहे. अ‍ॅटर्नी जनरल जॉश शैपिरो यांच्या नेतृत्वाखालील समितीने १८ मासांच्या सखोल चौकशीनंतर १ सहस्र ४०० पानांचा हा अहवाल बनवला.

४. पेनसिल्व्हेनिया आणि व्हॅटिकन सिटी येथील चर्चच्या वरिष्ठांनी लैंगिक शोषणाची प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला. (चर्चचे खरे स्वरूप जाणा ! अशा चर्चना अनाचाराचे अड्डे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक) यामुळे ही प्रकरणे न्यायालयात खटला चालवण्याच्या दृष्टीने जुनी झाली आहेत. अत्याचार करणार्‍या १०० पाद्य्रांचा आता मृत्यू झाला आहे. काही पाद्री निवृत्त झाले आहेत, तर काही पाद्री आता सक्तीच्या रजेवर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

५. अहवालानुसार पाद्य्रांनी लहान मुले आणि मुली यांचे लैंगिक शोषण केले. काही वेळेला पाद्य्रांनी लहान मुलांची अश्‍लील छायाचित्रे काढली. उपचारासाठी आलेल्या लहान मुलीवरही एका पाद्य्राने अत्याचार केले. (हिंदु संतांच्या भगव्या कपड्यांवरून टीका करणारे आता ख्रिस्ती पाद्य्रांच्या पांढर्‍या झग्यावर बोलतील का ? – संपादक)

६. अत्याचार करतांना काही मुलांना अमली पदार्थ देण्यात आले, तर काहींना आमीष दाखवण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF