शिवमंदिरात जलाभिषेक करणार्‍या मुसलमानास धर्मांधांकडून मारहाण

  • पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी न घातल्यावरून त्यांच्यावर टीका करणारे अशा घटनांविषयी मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात !
  • सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळावा आणि अन्यांनी त्यांची धर्मांधता जोपासावी, असाच देशात अलिखित निधर्मीवाद आहे !

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील रंछाड गावातील बाबू खान याने हरिद्वार येथून कावड यात्रेद्वारे गंगानदीचे जल आणून गावातील शिवमंदिरात जलाभिषेक केला. त्यानंतर तो शुक्रवारी नमाजासाठी गावातील मशिदीत गेला असता त्याला तेथील युवकांनी मारहाण करून हाकलून लावले. तसेच त्याला ‘मंदिरात जाऊन घंटाच वाजव’, असे रागाने सांगितले. या प्रकरणी बाबू खान याने पोलिसांत चौघांच्या विरोधात तक्रार केली आहे. मारहाणीनंतर बाबू खान म्हणाला, ‘‘असा अन्याय होऊ लागला, तर मला नाईलाजाने धर्मांतर करावे लागेल.’’

बाबू खाने याने सांगितले, ‘गेल्या ३ वर्षांपासून मला भगवान शिवाची आठवण येत होती. मी नेहमी शिवाची पूजा करतो.’ बाबू खान याने येथे एक लहान मंदिरही बांधले आहे. ‘मंदिर बांधल्यामुळे मला खूप शांतता मिळत आहे’, असे त्याने सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now