पाकिस्तानच्या कारागृहातून ३६ वर्षांनी भारतीय नागरिकाची सुटका होणार

जयपूर – ३६ वर्षे पाकच्या  कारागृहात राहिल्यानंतर गजेंद्र शर्मा यांची आता सुटका होणार आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी शर्मा यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्यावर १३ ऑगस्टला त्यांची सुटका होणार आहे.

१. वर्ष १९८२ पासून शर्मा बेपत्ता होते. तेव्हा ते ४० वर्षांचे होते. त्यांना पत्नी आणि २ मुले असा परिवार होता. आता त्यांना ६ नातवंडेही आहेत. ते जयपूरमध्ये मजुरीचे काम करत होते. मे २०१८ मध्ये ते लाहोरच्या कारागृहात असल्याची माहिती मिळाली होती.

२. जयपूरचे खासदार रामचरन बोहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्तपत्रांमधून आम्हाला ते पाकमधील कारागृहात असल्याचे समजले; पण ‘कशासाठी अटक करण्यात आली’, हे समजू शकले नाही. कुटुंबाने माझ्याकडे साहाय्य मागितले. शर्मा यांना पाकमध्ये २ मासांचीच शिक्षा झाली होती; मात्र अधिवक्ता न मिळाल्याने त्यांना ३६ वर्षे कारागृहात घालवावी लागली. (भारतीय नागरिकाला अधिवक्ताही उपलब्ध करून न देणार्‍या पाकच्या आतंकवादी कसाब याला भारताने लगेच अधिवक्ता दिला, हे लक्षात घ्या ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now