जम्मूमधील भाजपच्याच २ आमदारांचे कलम ‘३५- अ’ला समर्थन !

एकीकडे कलम ३७० हटवण्याचे आश्‍वासन देऊनही गेल्या ४ वर्षांत भाजपकडून ते हटवण्यात आलेले नाही आणि आता भाजपचेच २ आमदार याच कलमाला साहाय्यकारक असणार्‍या ‘३५-अ’ कलमाचे समर्थन करून हिंदूंचा विश्‍वासघात करत आहेत !

नवी देहली – जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ‘३५ – अ’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट आहे. यावर सुनावणी होणार आहे. या कलमाच्या समर्थनार्थ काश्मीरमधील फुटीरतावादी आणि राजकीय पक्ष यांनी काही दिवसांपूर्वी ‘काश्मीर बंद’ही पुकारला होता. ‘हे कलम काढल्यास राज्यात भारताचा झेंडा फडकणार नाही’, अशा धमक्याही काही जणांनी दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जम्मूमधील भाजपचे राजेश गुप्ता आणि डॉ. गगन भगत या २ आमदारांनी या कलमाचे समर्थन केले आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पीडीपीच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यातही उत्साह निर्माण झाला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘काश्मीरला असलेला विशेषाधिकार वाचवण्याची गोष्ट आता एका धर्मापुरती मर्यादित राहिलेली नाही; कारण आता इतरांनाही त्याचे महत्त्व लक्षात आले आहे.’’ ‘३५ – अ’ कलमामुळेच काश्मीरमध्ये इतर राज्यांतील नागरिक जमीन खरेदी करू शकत नाहीत, तसेच काश्मीरमधील तरुणीने अन्य राज्यातील मुलाशी विवाह केल्यास तिला पित्याच्या संपत्तीमध्ये तिचा वाटा मिळत नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now