राममंदिराच्या सूत्रावरून सत्तेवर आलेले भाजप सरकार अयोध्येत मंदिर न बांधता राज्यातील मंदिरेच उद्ध्वस्त करत आहे ! – शिवसेना

मंदिरांच्या संदर्भात होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही ! – शिवसेना

नाशिक महानगरपालिकेच्या अनधिकृत धर्मस्थळे हटवण्याच्या मोहिमेला शिवसेनेचा विरोध

प्रत्येक वेळी हिंदूंच्या बाजूने केवळ शिवसेनाच उभी रहाते. त्यामुळे हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !

नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या अनधिकृत धर्मस्थळे हटवण्याच्या मोहिमेला शिवसेनेने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील ५७५ अनधिकृत धर्मस्थळे हटवण्यासाठी महापालिका पुन्हा मोहीम राबवणार आहे. शिवसेनेने यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, ‘‘अयोध्येत राममंदिर बांधण्याची घोषणा करून भाजप सरकार सत्तेवर आले आहे; मात्र प्रत्यक्षात असे मंदिर तेथे बांधले गेले नाहीच, उलट राज्यात आणि विशेषत: नाशिकमध्ये मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व धर्मियांनी एकत्र यावे.’’ विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे व दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषद घेतली.

ही मोहीम राबवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. ‘ही धार्मिक स्थळे किती दिवसात हटवणार’, यासंदर्भात उच्च न्यायालयाने आयुक्तांकडे १३ ऑगस्टच्या आत हमीपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सिद्धता चालू आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now