श्रीलंकेकडून २७ भारतीय मासेमारांना अटक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने ११ ऑगस्टला २७ भारतीय मासेमारांना अटक केली आहे. त्यांच्या ४ नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. ‘भारतीय मासेमार अवैधरित्या आमच्या सीमेमध्ये घुसतात’, असा आरोप श्रीलंका नेहमीच करत आली आहे आणि श्रीलंकेच्या नौदलाने अनेकदा त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत १०० भारतीय मासेमारांचा मृत्यू झाला आहे. (इतके होऊनही भारत सरकार निष्क्रीय रहाते, हे संतापजनक ! जर भारतीय मासेमारांना आंतरराष्ट्रीय सीमा लक्षात येत नसेल, तर सरकार त्याविषयी उपाययोजना का काढत नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF