‘श्रीकृष्णच कर्ता-करविता असून त्याच्याविना स्वतःचे काहीही अस्तित्व नाही’, हा संस्कार मनात निर्माण करून त्याची जाणीवही त्यानेच करून दिल्याविषयी श्रीकृष्णाला लिहिलेले कृतज्ञतापूर्वक पत्र !

कु. पेत्रा स्टिच

हे श्रीकृष्णा,

गेल्या काही आठवड्यांपासून तुझ्या भावसत्संगांना उपस्थित रहाण्याची अमूल्य संधी तू आम्हाला उपलब्ध करून दिलीस. संत आणि उन्नत साधक यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून भाववृद्धी करण्याचे महत्त्व तू आम्हाला विविध प्रकारे शिकवत आहेस. कित्येकदा आम्हाला भावाच्या सामर्थ्याच्या अनुभूती आल्या आहेत. भावजागृतीसाठी प्रयत्न केल्यास स्वतःला होणार्‍या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता सहजतेनेे उणावते, तसेच भावामुळे अहंचे प्रकटीकरण आणि नकारात्मक विचार त्वरित थोपवले जातात. या सुंदर भावसत्संगांच्या केवळ आठवणीनेही आमचे लक्ष पुन्हा तुझ्यावर केंद्रित होत असल्याचे आमच्यापैकी कित्येकांनी अनुभवले आहे. या सर्व अनमोल अनुभूतींमुळे तुझ्यावरील आमची श्रद्धा दृढ होते. यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला आमच्याकडे शब्द नाहीत. तुझी प्रीती मिळवणारे आम्ही खरोखर भाग्यवान आहोत.

हे श्रीकृष्णा, १८.३.२०१७ या दिवशी झालेल्या भावसत्संगानंतर ‘तुझी कृपा किती अगाध आहे’, याची मला जाणीव झाली. गेल्या काही आठवड्यांपासून तू माझ्या साधनेत पुष्कळ अडथळे निर्माण केलेस; पण तुझ्या कृपेने भाववृद्धीच्या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात परिस्थिती स्वीकारणे, शरण जाणे अन् त्याविषयी कृतज्ञ रहाणे’, हे तुझ्यामुळेच मला शक्य झाले. आज भावसत्संगाच्या वेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याविषयीचे विचार तूच माझ्या मनात घातलेस. भावसत्संग संपण्यापूर्वीच माझ्या भ्रमणभाषची ‘बॅटरी’ संपली. तेव्हा तूच मला सकारात्मक स्थितीत आणि कृतज्ञता भावात स्थिर ठेवलेस. शेवटी भावसत्संगाच्या वेळी तांत्रिक अडचणी पुष्कळ वाढून त्यांवर उपाय शोधणे अशक्य झाले. तेव्हा ‘कार्यालयातील संगणकाचा उपयोग सेवेसाठी कर’, हा विचार तूच माझ्या मनात घातलास.

या परिस्थितीत माझी चिडचिड होऊन माझ्यातील ‘अपेक्षा करणे’ आणि ‘कर्तेपणा’ हे अहंचे पैलू उफाळून आले, तरीही तू मला तुझे विचार आणि इच्छा यांप्रमाणे वागण्याची बुद्धी दिलीस. अशा प्रकारे मला माझ्या मनाप्रमाणे वागू न देता तू तुझ्या इच्छेनुसार माझ्याकडून सेवा करवून घेतलीस. या पूर्वी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यावर माझ्यातील ‘स्वतःचेच खरे करणे’, या दोषामुळे मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागता येत नसे. ‘माझ्या साधनेतील अडथळे मी भाववृद्धीच्या प्रयत्नांमुळे दूर करू शकते’, अशी भावना माझ्या मनात निर्माण झाल्यामुळे माझ्यातील ‘कर्तेपणा’ आणि ‘मी’पणा हा अहं पुष्कळ वाढला आहे’, हे आतापर्यंत माझ्या लक्षातच आले नव्हते.

हे श्रीकृष्णा, तू मला असंख्य सुंदर अनुभूती दिल्या आहेस. आनंद आणि शांती यांचे वेगवेगळे टप्पे अनुभवायला दिलेस, यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. आज मात्र तू मला ‘माझे तुझ्याविना काही अस्तित्व नसून तूच कर्ता-करविता आहेस’, हा संस्कार माझ्या मनात निर्माण केली असल्याची जाणीव करून दिलीस. माझ्या मनातील हा अत्यंत अमूल्य संस्कार आणखी दृढ व्हावा, यासाठी मला आलेल्या सुंदर अनुभूती, आनंद आणि शांती यांची स्थिती हे सर्व कोणत्याही विकल्पाविना क्षणार्धात देऊन टाकायला मी सिद्ध आहे. ‘येथून पुढे केवळ असेेच घडावे’, अशी माझी इच्छा आणि आवश्यकता आहे.

– तुझ्या चरणकमली भक्तीपूर्वक सर्मपित,

कु. पेत्रा स्टिच, युरोप (२४.३.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now