साधनेविषयी येणार्‍या नकारात्मक विचारांनी मनात घर केले असता कार्यशाळेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर मनमोकळेपणाने बोलता येऊन हलकेपणा आणि आनंद अनुभवणारे इंडोनेशिया येथील श्री. कोन्तार्दो !

श्री. कोन्तार्दो

१. दीड वर्षापासून मनात साधनेविषयी येणारे नकारात्मक विचार !

१ अ. नकारात्मक विचारांमुळे साधनेत अडथळे निर्माण होऊन तळमळ न्यून होणे : गेल्या दीड वर्षापासून माझ्या मनात साधनेविषयी विकल्प अन् नकारात्मक विचार येत असल्यामुळे मी हैराण झालो होतो. साधनेमुळे मला कुटुंबाला वेळ देता येणार नाही. मला ऐहिक सुख अधिक प्रमाणात घेता येणार नाही इत्यादी विचारांनी मी त्रस्त होतो. या नकारात्मक विचारांमुळे माझ्या साधनेत अडथळे निर्माण झाले होते. माझी साधना करून आध्यात्मिक उन्नती करण्याची तळमळ न्यून होत ती जवळजवळ शून्यापर्यंत पोहोचली होती.

१ आ. कार्यशाळेसाठी रामनाथी आश्रमात येऊ नये, असे वाटणे : मला २०१८ च्या कार्यशाळेला उपस्थित रहाण्यासाठी सांगितले. तेव्हा काही तरी कारण पुढे करून आश्रमात जाण्याचे टाळावे, असे विचार माझ्या मनात येत होते. केवळ देवाची कृपा आणि पू. रेन्डीदादा यांचे मार्गदर्शन यांमुळे माझी इच्छा नसतांनाही मी शिबिरासाठी आश्रमात पोहोचलो.

१ इ. आश्रमात आल्यावर वाटणारी भीती : आश्रमात आल्यानंतरही माझ्या मनात विकल्पाने, तसेच मी चांगला साधक नसल्याचे मला सांगितले जाईल, या भीतीने घर केले होते.

१ ई. पू. सिरियाकदादा सद्गुरु झाल्याचा सोहळा पाहिल्यावर स्वतःची एवढी आध्यात्मिक उन्नती कधीच होणार नाही, या विचारामुळे नकारात्मकता येणे : शिबिराच्या पहिल्या दिवशी देवाच्या कृपेने मला पू. सिरियाकदादा सद्गुरुपदी विराजमान झाल्याचा सोहळा पहाण्याची संधी मिळाली; परंतु मनातील अडथळ्यांमुळे मला त्या सोहळ्यातील चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करता आले नाही. सोहळ्यानंतर माझे सांसारिक जीवन संपेल, या भीतीमुळे मला साधना करायची नाही, माझी एवढी आध्यात्मिक उन्नती कधीच होणार नाही, या विचारांमुळे मी अधिक नकारात्मकतेत गेलो.

२. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी मनमोकळेपणाने बोलल्याने आलेली अनुभूती !

२ अ. चुकांचे सत्र चालू झाल्यावर मनातील सर्व विकल्पांविषयी सांगणे आणि सत्संगसेवकांनी विकल्प दूर करण्यासाठी उपाय सांगितल्यावर मनावर असलेले काळे मळभ अकस्मात दूर झाल्याची अनुभूती येणे : शिबिराच्या दुसर्‍या दिवशी साधकांकडून झालेल्या चुकांचे सत्र चालू झाले. एरव्ही या सत्राच्या वेळी माझी प्रतिमा आड येत असल्याने मला हे सत्र नकोसे वाटायचे; मात्र या वेळी मला वेगळेच जाणवले. माझ्या मनातील विकल्पांमुळे झालेली चूक सांगण्याची मला संधी मिळाली. तेव्हा मी मनमोकळेपणाने माझ्या मनातील सर्व विकल्पांविषयी सांगितले. माझ्या अपेक्षेप्रमाणे सत्संग घेणार्‍या साधकांनी माझ्याकडून झालेल्या चुकांचे विश्‍लेषण करून ते अडथळे दूर करण्यासाठी उपाय सांगितले. तेव्हा काही काळापासून माझ्या मनावर असलेले काळे मळभ अकस्मात दूर झाले आहे, असे मला जाणवले.

२ आ. आतापर्यंत कठीण वाटणारी प्रक्रिया सुलभ वाटू लागणे : आतापर्यंत जे कठीण वाटत होते, ते आता सहज शक्य आहे, असे मला आतून वाटत आहे. मनावर साधनेचे महत्त्व बिंबवण्यासाठी स्वयंसूचना द्या, हा मला सांगण्यात आलेला उपाय अतिशय सोपा असला, तरी त्याचा खोलवर होणारा परिणाम अत्यंत प्रभावी आहे.

२ इ. मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलकेपणा आणि आनंद अनुभवायला मिळणे : पूर्वी मला मनमोकळेपणाने बोलल्याने आपल्या अहंला धक्का पोहोचतो, जो अत्यंत क्लेशदायक असून तोच मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रमुख उद्देश आहे, असे वाटायचे; परंतु माझ्या आजच्या अनुभूतीवरून मला शिकायला मिळाले, मनमोकळेपणाने बोलल्यामुळे मानसिक स्तरावरील सर्व अडथळे दूर होतात अन् त्यामुळे आपल्याला आतून हलकेपणा आणि आनंद अनुभवायला मिळतोे.

मला ही अनुभूती आणि ही शिकवण दिली, याबद्दल मी देवाच्या अन् परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतोे.

– श्री. कोन्तार्दो, इंडोनेशिया (५.८.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now