सैन्याला निकृष्ट गुणवत्तेचे पॅराशूट पुरवण्यात आले आणि तक्रार करूनही सुधारणा केली नाही ! – महालेखापरीक्षक

  • भाजपच्या राज्यातही असे प्रकार होणे लज्जास्पद ? याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याचे धाडस सरकार दाखवील का ?
  • युद्धांच्या वेळी निकृष्ट पॅराशूटचा वापर केला गेला, तर शत्रूऐवजी आपल्याच लोकांमुळे सैनिकांचा मृत्यू होईल, हे सरकारच्या लक्षात येत नाही का ?

नवी देहली – कानपूर येथील शस्त्र पॅराशूट कारखान्यामध्ये पायदळ, नौदल आणि वायूदल यांच्यासाठी निकृष्ट गुणवत्तेचे पॅराशूट बनवण्यात आले. यामुळे सैन्याच्या युद्धसज्जतेवरही त्याचा परिणाम झाला. सैन्याने केलेल्या तक्रारीनंतरही कारखान्याकडून गुणवत्तेत सुधारणा झाली नाही, असे कोरडे महालेखापरीक्षकांच्या अहवालात ओढण्यात आले आहेत. महालेखापरीक्षकांनी त्यांचा अहवाल ७ ऑगस्टला संसदेत सादर केला आहे.

या अहवालात पुढे म्हटले आहे की,

१. सैन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पॅराशूटची आवश्यकता असते. काही पॅराशूट देशात बनतात, तर काही विदेशातून विकत घेतले जातात. देशातील पॅराशूटची निर्मिती कानपूर येथील कारखान्यात केली जाते. तेथे निकृष्ट पॅराशूट बनवण्यात आले. या पॅराशूटच्या माध्यमातून व्यक्तीला खाली उतरवणे धोकादायक आहे.

२. वर्ष २०१४ ते २०१७ या कालावधीत कानपूर कारखान्याकडून बनवण्यात आलेल्या ७३० पॅराशूटची गुणवत्ता अत्यंत वाईट होती. त्याचे मूल्य ११ कोटी रुपये होते. या पॅराशूटचा वापर केला जाऊ शकत नाही. (ही रक्कम संबंधितांकडून वसूल केली पाहिजे ! – संपादक)

३. या कारखान्याने वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत पॅराशूटचे निर्धारित लक्ष्य केवळ ५ वेळा पूर्ण करण्यात आले, तर १९ वेळा विलंब करण्यात आला. निकृष्ट गुणवत्तेच्या पॅराशूटमुळे सैन्याच्या संचलनाच्या वेळी याचा वापर होऊ शकला नाही.

४. नवीन विकसित पॅराशूटचे उत्पादन गुणवत्तेच्या मानकांप्रमाणे नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले नाही. त्यामुळे ११ वर्षांची वाट पाहूनही सैन्याला चांगल्या गुणवत्तेचे पॅराशूट मिळू शकलेले नाहीत. तसेच या कारखान्याकडून संरक्षण मंत्रालयाच्या प्रश्‍नांची उत्तरेही देण्यात आलेली नाहीत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now