भारतात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी बौद्ध आणि मागासवर्गीय यांनी चालू केलेल्या हिंसक कारवाया !

‘३१ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ या दिवशी घडलेले कोरेगाव भीमा दंगल प्रकरण आणि त्याचे ३ जानेवारी या दिवशी उमटलेले हिंसक पडसाद पाहून लक्षात येते, ‘आता बौद्ध, मागासवर्गीय यांनाही ‘स्वतःला वेगळे स्थान मिळावे’, असे वाटू लागले आहे. त्याची नांदी ठरणार्‍या अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना पुढे दिल्या आहेत.

१. येणार्‍या काळात बौद्धही महाराष्ट्रातील निवडणूक लढवणार आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे आमदार रामदास आठवले यांनी बौद्धांच्या संघटनांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. (‘हा एकप्रकारे हिंदु धर्मावर आघात करण्याचाच प्रयत्न आहे.’ – संकलक)

२. उत्तरप्रदेशात वर्ष २०१५ मध्ये चंद्रशेखर आझाद रावण नावाच्या व्यक्तीने शस्त्रसज्ज सदस्य असलेल्या ‘भीम आर्मी’ची स्थापना केली होती.

३. सध्या चंद्रशेखर यांच्यावर सहारणपूर येथील दंगल भडकण्यासाठी कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने वर्ष २०१७ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लावला आहे. ‘त्यांची कारागृहातून सुटका व्हावी’, यासाठी आता महाराष्ट्रात कोरेगाव-भीमा येथील संघर्षास कारणीभूत असल्याचा आरोप असलेले आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ९.१.२०१८ या दिवशी एका मोर्च्याद्वारे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

यावरून लक्षात येते, ‘भारतातील बौद्धही आता हिंदु धर्माच्या विरोधात हिंसक कारवाया करू लागले आहेत.’ हिंदूंची मूर्तीपूजेची संस्कृती भ्रष्ट करून त्यांच्यावर बौद्ध संस्कृती बळजोरीने लादू पहात आहेत. आता श्रीलंका हे बौद्धांचे मूळ स्थान बनले आहे. तेथेच बौद्धांनी हिंदु संस्कृती नष्ट करून स्वपंथाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला आहे.’

– श्री. प्रशांत कोयंडे, घाटकोपर, मुंबई. (८.७.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now