बुरखा घातलेल्या महिला बँक लुटारू वाटतात ! – ब्रिटीश खासदार बोरीस जॉन्सन

ब्रिटनमधील राजकारणी बुरखाधारी मुसलमान महिलांविषयी उघडपणे त्यांची मते व्यक्त करतात. भारतात असे कोणी बोलल्यास त्याच्यावर ‘धर्मांध’ असा शिक्का मारला जाईल !

लंडन – बुरखा घातलेल्या मुसलमान महिला बँक लुटारूंसारख्या दिसतात, तसेच बुरखा घालून सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या या महिला पोस्टाच्या पेटीसारख्या दिसतात, अशी विधाने ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव आणि सध्याचे खासदार बोरीस जॉन्सन यांनी ‘टेलिग्राफ’ दैनिकामध्ये लिहिलेल्या लेखात केली आहेत. या लेखावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. गेल्याच आठवड्यात युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम आणि ऑस्ट्रिया यांच्याप्रमाणे डेन्मार्कनेही बुरख्यास बंदी घातली आहे.

जॉन्सन यांनी ‘टेलिग्राफ’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये पुढे म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी संवाद साधतांना बुरख्यास बंदी असावी. शाळांमध्ये आणि विद्यापिठांमध्ये बुरखा घालता येणार नाही, असे नियम बनवायला हवेत. विविध उद्योगांमधल्या कर्मचार्‍यांचा आणि ग्राहकांचा संवाद होतांना बुरख्याचा अडसर असता कामा नये; मात्र सरसकट बुरखा बंदीही असू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now