चीन भारताच्या सीमेजवळ ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट’ तैनात करणार

युद्धसज्ज चीनशी दोन हात करण्यास भारत सिद्ध आहे का ?

नवी देहली – चीन लवकरच तिबेटमध्ये भारतीय सीमेच्या जवळ ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेट’ तैनात करण्याची शक्यता आहे.  सध्या चिनी सैन्याकडून या रॉकेटच्या चाचण्या करण्यात येत आहेत. चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले.

१. ऑक्सिजनची कमतरता असलेल्या उंच पर्वतीय प्रदेशात हे रॉकेट प्रचंड उपयुक्त आहे. युद्ध प्रसंगात उंचावरील प्रदेशात पारंपरिक शस्त्रे वाहून नेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या तुलनेत हे नवीन रॉकेट वेगाने तैनात करता येऊ शकते.

२. ‘भारताचे आव्हान लक्षात घेता सैनिकी दृष्टीने पारंपरिक शस्त्रांपेक्षा ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट’ अधिक उपयुक्त ठरील’, असे बीजिंग येथील संशोधक हान जनली यांनी सांगितले.

३. मागच्याच मासात चिनी सैन्याने भारताला लागून असणार्‍या सीमेवर तिबेटमध्ये वातावरणाची माहिती देणारे मानवरहित स्वयंचलित ‘वेदर स्टेशन’ उभारले आहे. तणावाच्या परिस्थितीत सैन्याला याचे मोठे साहाय्य होणार आहे. यामुळे मिळणार्‍या हवामान विषयक माहितीमुळे चीनची सुरक्षा अधिक बळकट व्हायला साहाय्य होणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now