देशातील प्रत्येक भागात बलात्कार होत आहेत ! – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

  • देशातील बलात्कार रोखू न शकणारे शासनकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात !
  • बलात्कार केवळ कायदा आणि सुव्यवस्थेमुळे रोखले जाणार नाहीत, तर त्यासाठी लोकांमध्ये नैतिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ही नैतिकता निधर्मी लोकशाहीत निर्माण होणार नाही, तर त्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थाच हवी !

नवी देहली – देशभरात असे का होत आहे ? उजवीकडे, डावीकडे, मधे अशा देशातील प्रत्येक भागात बलात्कार होत आहेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बलात्काराचे प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील देवरिया येथील बालिकागृहातील मुलींवरील लैंगिक अत्याचार या  प्रकरणांवर न्यायालयाने वरील कोरडे ओढले.

१. सर्वोच्च न्यायालयाने ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’चा (एनसीआरबीचा) दाखला देतांना म्हटले की, देशात प्रत्येक ६ घंट्याला १ बलात्कार होत असून वर्षभरात ३८ सहस्रांहून अधिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. देशातील सर्वाधिक बलात्कार मध्यप्रदेशमध्ये होतात. त्यानंतर उत्तरप्रदेशचा क्रमांक लागतो. (या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. केंद्रातही भाजपचीच सत्ता आहे; मात्र असे असतांनाही बलात्कारासारख्या घटना न्यून झालेल्या नाहीत, हे भाजपला लज्जास्पद ! – संपादक)

२. बिहार सरकारला न्यायालयाने म्हटले, ‘‘राज्य सरकार २००४ पासून बालिकागृहांना पैसा पुरवत आहे; परंतु तेथे काय होते याविषयी त्याला कल्पना नाही. याविषयी जाणणे महत्त्वाचे वाटले नाही. असे वाटते की, हा प्रकार मूकसंमतीने चालू आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याची चौकशी अधिकार्‍यांनी उशिरा चालू केली.’ न्यायालयाने अधिकार्‍यांनाही विचारले, ‘तुम्ही कसले अन्वेषण करत आहात ?’

३. खासगी संस्थेच्या अहवालात बिहारमध्ये सरकारच्या पैशांवर १५ संस्थांकडून चालवण्यात येणार्‍या बालिकागृहांचा उल्लेख केला आहे. येथेही असेच होते, असा संशय आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now