(म्हणे) ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून देशात रक्तपात होऊन यादवी माजेल !’ – ममता बॅनर्जी

देशात यादवी कोण माजवणार ? आणि का माजवणार आहेत ?, हेही ममता(बानो) बॅनर्जी यांनी सांगायला हवे ! अशी देशविरोधी विधाने करून त्या घुसखोरांचे समर्थन करून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत !

नवी देहली – आसाममध्ये बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेद्वारे ४० लाख लोकांना घुसखोर ठरवण्यात आल्याने देशात रक्तपात होऊन यादवी निर्माण होऊ शकते, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे. ‘भाजप राजकीय लाभासाठी लाखो लोकांना देशातून हाकलण्याचा प्रयत्न करत आहे’, असेही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

ममता बॅनर्जी यांच्या आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून ‘देशात रक्तपात आणि यादवी होईल,’ या वक्तव्याच्या विरोधात आसाममध्ये भाजप युवा मोर्चाच्या ३ जणांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे. ‘ममता बॅनर्जी आसाममध्ये सांप्रदायिक शांततेला हानी पोहोचवत आहेत’, असे या तक्रारीत म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF