रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलण्याचा राज्यांनाही अधिकार ! – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

राज्य आणि केंद्र दोघांनाही अधिकार असतांना देशातील ४० सहस्र रोहिंग्यांना अद्यापपर्यंत हाकलण्यात का आले नाही ?, हे राजनाथ सिंह यांनी सांगितले पाहिजे !

नवी देहली – बांगलादेशातून रोहिंग्या मुसलमानांची भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्स यांचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी त्यांच्या राज्यात आधीच शिरलेल्या रोहिंग्यांवर लक्ष ठेवा, त्यांना एकाच ठिकाणी ठेवा अन्य ठिकाणी पसरू देऊ नका. त्यांना देशाबाहेर हाकलण्याचे अधिकार राज्यांना आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केले.

बंगालमध्ये १ कोटीहून अधिक घुसखोर असतील ! – भाजप

  • इतके घुसखोर असल्याची माहिती असतांना भाजपने गेल्या ४ वर्षांत त्यांना बाहेर का काढले नाही ?
  • संपूर्ण देशात किती घुसखोर आहेत ? आणि त्यांना कधी बाहेर काढणार, ते भाजप सरकारने सांगावे !

कोलकाता – घुसखोरी करणार्‍या लोकांची आकडेवारी आसाममध्ये घोषित झाल्यानंतर आता बंगालचा क्रमांक असेल. या राज्यातील घुसखोरांचा आकडा १ कोटींपेक्षा अधिक असेल, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे बंगाल राज्याचे प्रभारी (प्रमुख) कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले की, बंगालच्या तरुणांना त्यांच्या राज्यात बांगलादेशामधून किती स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे, हे जाणून घ्यायचे आहे. या घुसखोरांमुळे येथील भूमीपुत्रांना रोजगार आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजपचा या तरुणांच्या मागणीला पाठिंबा आहे.


Multi Language |Offline reading | PDF