बांगलादेशात हिंदु मुलीचे धर्मांतरासाठी अपहरण

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या ‘बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराविषयी तेथील सरकारशी संपर्क ठेवून आहोत’, असे म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात तेथे हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत, ही वस्तूस्थिती आहे ! भारत सरकार देशातील जनतेची दिशाभूल करत आहे, असेच स्पष्ट होते !

ढाका – नारायणगंज जिल्ह्यात असलेल्या गोपालादीया गावातील रहिवासी १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. पूजा राणी घोष ही १४ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता तिच्या नातेवाइकांसह रथयात्रा बघायला गेली होती. त्या वेळी काही धर्मांधांनी तिला बळजबरीने पळवून नेले. मुलीच्या नातेवाइकांनी हे बघताच आरडाओरडा केला; मात्र त्याचा काही लाभ झाला नाही.

१. मुलीचे मामा श्री. प्रदीप घोष यांनी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांचे सहकारी यांच्यासह जाऊन १७ जुलै या दिवशी माधाब्दी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यात ५ धर्मांधांच्या नावासह इतर २ -३ अज्ञात धर्मांधांची नावे या अपहरणामागे असल्याचे सांगितले. प्रथम पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली; मात्र नोर्संगडी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या हस्तक्षेपानंतर तक्रार नोंदवून घेतली गेली. तरीही आतापर्यंत पोलिसांना मुलीला शोधण्यात आणि आरोपींना अटक करण्यात अपयश आले आहे.

२. अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांचे सहकारी यांनी स्थानिक साक्षीदार अन् संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी तपास अधिकारी उपनिरीक्षक मिझानुर रहमान यांनी तक्रारीत ‘अनेक धर्मांधांऐवजी एकाचेच नाव द्यावे’, असा आग्रह धरला. यावरून त्यांनी दिलेल्या भेदभावाची वागणूक दिसून येते.

३. बांगलादेश मायनॉरिटी वॉचने या घटनेविषयी गंभीर चिंता व्यक्त करून ‘आरोपींना त्वरित अटक करावी आणि मुलीला मुक्त करून न्यायालयात उपस्थित करावे’, अशी मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF